Lakhimpur Kheri Case : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राच्या जामिनाला आव्हान; मृत शेतकर्‍यांचे कुटुंबिय सर्वोच्च न्यायालय

आशिष मिश्रा हा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे. त्याला जामीन मंजूर करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आशिष मिश्राने लखीमपूर खेरीमध्ये भरधाव कारखाली आंदोलक शेतकर्‍यांना चिरडले होते. या प्रकरणात आशिष मिश्राची नुकतीच जामीनावर सुटका झाली आहे.

Lakhimpur Kheri Case : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राच्या जामिनाला आव्हान; मृत शेतकर्‍यांचे कुटुंबिय सर्वोच्च न्यायालय
ओबीसी आरक्षणाची सुनावणी 28 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 11:38 PM

नवी दिल्ली : संपूर्ण देशभर गाजलेल्या आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेल्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हत्या (Lakhimpur Kheri Murder) प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra)च्या अडचणीत मोठी भर पडली आहे. आशिष मिश्रा हा नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर पडला आहे. मात्र त्याला मंजूर झालेल्या जामिनाविरोधात आता लखीमपूर खेरीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. निष्पाप शेतकर्‍यांचा भरधाव कारखाली चिरडण्याचा गंभीर गुन्हा केलेल्या आशिष मिश्राला जामीन मंजूर झालाच कसा? असा सवाल शेतकरी कुटुंबियांनी आपल्या याचिकेतून उपस्थित केला आहे. (Lakhimpur Kheri case accused Ashish Mishra’s bail challenged)

आशिष मिश्रा हा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे. त्याला जामीन मंजूर करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आशिष मिश्राने लखीमपूर खेरीमध्ये भरधाव कारखाली आंदोलक शेतकर्‍यांना चिरडले होते. या प्रकरणात आशिष मिश्राची नुकतीच जामीनावर सुटका झाली आहे. त्याला जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाला लखीमपूर खेरीत कारखाली चिरडलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी आव्हान दिले आहे. आशिष मिश्राच्या जामीनाला आव्हान देण्यास उत्तर प्रदेश सरकार अपयशी ठरलेय. त्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत असल्याचे शेतकरी कुटुंबियांनी याचिकेत म्हटले आहे.

याचिकेत नेमके काय म्हटलेय?

शेतकरी कुटुंबियांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने आशिष मिश्राला जामीन मंजूर करीत दिलेला निर्णय चुकीचा आहे. न्यायालयाने आशिष मिश्राविरुद्धचे ठोस पुरावे विचारात घेतलेले नाहीत. त्याच्यावरील आरोपपत्र रेकॉर्डवर आणले गेलेले नाही. उच्च न्यायालयाने गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, आरोपपत्रातील आरोपी, पीडित व साक्षीदार यांच्या विरोधात ठोस पुरावे संदर्भात आरोपीच्या स्थितीची शक्यता विचारात न घेताच आशिष मिश्राला जामीन मंजूर केला. आरोपी आशिष मिश्राकडून गुन्ह्याची पुनरावृत्ती घडू शकतो. तसेच तो साक्षीदारांशी छेडछाड करून न्यायाच्या मार्गात अडथळा आणू शकतो, अशी शक्यताही याचिकेतून वर्तवण्यात आली आहे. (Lakhimpur Kheri case accused Ashish Mishra’s bail challenged)

इतर बातम्या

Nanded Accident : नांदेडमध्ये पिकअप ऑटो आणि टिप्परचा भीषण अपघात, 5 ठार आणि 5 गंभीर जखमी

Satara Crime : अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार, नऊ आरोपींना अटक, साताऱ्यातील पाटण येथील घटना

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.