नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारसह केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. दुपारी सव्वा चार वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यापूर्वीही संजय राऊत आणि राहुल गांधी यांची भेट चर्चेचा विषय ठरली होती. त्यावेळी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील चर्चेचा एक फोटोही चांगलाच चर्चिला गेला होता. त्यानंतर आज होणारी भेटही राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. (Shivsena MP Sanjay Raut will meet Congress leader Rahul Gandhi)
लखीमपूरमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. त्यात एक जीप शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील अनेक बड्या नेत्यांनी हा व्हिडीओ ट्वीट करुन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधलाय. इतकंच नाही तर दोन दिवसांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि राहुल गांधी यांची होणारी भेट महत्वाची मानली जात आहे.
लखीमपूर हिंसाचारामुळे देश हादरला आहे. प्रियंका गांधी यांना यूपी सरकारनं अटक केलीय. विरोधी नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात येतोय. उत्तर प्रदेश सरकारकडून सुरु असलेल्या दडपशाही विरोधात संयुक्त विरोधी कारवाईची गरज आहे. राहुल गांधी यांना दुपारी सव्वा चार वाजता भेटणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दिलीय.
#LakhimpurKheriViolence has shaken the nation,@priyankagandhi has been arrested UP govt, opposition leaders are being restricted from meeting farmers. There is need for joint opposition action against oppression by Government in UP. Meeting @RahulGandhi at 4.15 pm today
जय हिंद!— Sanjay Raut (@rautsanjay61) October 5, 2021
सीतापूरमध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियांका गांधींनी कलम -144 चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. आधी नजरकैदेत ठेवलेल्या प्रियांकांवर युपी पोलिसांनी 36 तासांनी कारवाई केली आहे.
प्रियांका गांधींना काहीच वेळात कोर्टात दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाऊ शकते. याआधी प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलिस हवं तेव्हा मला अटक करु शकतात पण मी शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा निश्चय बोलून दाखवत त्यांनी पोलिसांना आव्हान दिलं होतं.
Priyanka Gandhi Vadra, 11 others booked by UP Police for ‘disturbing peace’
Read @ANI Story | https://t.co/xQeOqgKi8X#PriyankaGandhi #LakhimpurKheriViolence pic.twitter.com/uDj8uI2SAC
— ANI Digital (@ani_digital) October 5, 2021
प्रियांका गांधींच्या जिगरबाजपणाला राहुल गांधी यांनी दाद दिली आहे तसंच त्यांची हिम्मतही वाढवली आहे. ज्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात ठेवलंय, ती घाबरत नाही. ती सच्ची काँग्रेसी आहे, कधीच हार मानणार नाही. प्रियांका मला माहिती आहे, तू मागे हटणार नाहीस. न्यायाच्या अहिंसक लढाईत देशाच्या अन्नदात्याला जिंकवल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशातील नरसंहार बघूनही जो शांत आहे, तो अगोदरच मेलेला आहे. पण शेतकऱ्यांच्या बलिदानाला आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, असं ट्विट करुन राहुल गांधी म्हणाले आहेत.
जिसे हिरासत में रखा है, वो डरती नहीं है- सच्ची कांग्रेसी है, हार नहीं मानेगी!
सत्याग्रह रुकेगा नहीं।#FarmersProtest
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 5, 2021
इतर बातम्या :
Priyanka Gandhi Arrested : आधी नजरकैद, आता अटक, प्रियांका गांधींवर UP पोलिसांकडून 36 तासांनी कारवाई
Shivsena MP Sanjay Raut will meet Congress leader Rahul Gandhi