Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्राला 3 दिवसांची पोलीस कोठडी

, विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने आशिष मिश्राची 14 दिवसांची कोठडी मागितली होती. आशिष मिश्राची पोलीस कोठडीत रवानगी करताना न्यायालयानं काही अटीही ठेवल्या आहेत.

Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्राला 3 दिवसांची पोलीस कोठडी
आशिष मिश्राला 3 दिवसांची पोलीस कोठडी
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 6:02 PM

लखीमपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राला (Ashish Mishra) न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Remand) सुनावली आहे. दरम्यान, विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने आशिष मिश्राची 14 दिवसांची कोठडी मागितली होती. आशिष मिश्राची पोलीस कोठडीत रवानगी करताना न्यायालयानं काही अटीही ठेवल्या आहेत. (Ashish Mishra has been remanded in police custody for three days)

उत्तर प्रदेशमध्ये विशेष तपास पथकानं 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना शनिवारी अटक केली होती. त्यापूर्वी आशिष मिश्रा यांची 12 तास चौकशी करण्यात आली. आशिष मिश्राच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी न्यायालयात कोठडी वाढवून देण्याची याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली.

आशिष मिश्राच्या वकिलांचा एसआयटीला सवाल

सुनावणी दरम्यान, आशिष मिश्राच्या वकिलाने न्यायालयात पोलिसांना सांगितले, जर तुमच्याकडे प्रश्नांची अधिक यादी असेल तर दाखवा, आशिषने तपास अधिकाऱ्यापुढे कलम 161 अन्वये आधीच जबाब नोंदवला आहे. असं असलं तरी, पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आशिषने तपासात सहकार्य केलं नाही. मिश्राचे वकील अवधेश म्हणाले की, एसआयटीनं सांगावं की त्याला कोठडी का हवी आहे, त्यांना आशिषला कुठे घेऊन जायचं आहे?

या प्रकरणात मिश्राचा बचाव करताना वकील म्हणाले की तुम्ही आम्हाला 40 प्रश्नांची प्रश्नावली दिली होती. पण तुम्ही हजारो प्रश्न विचारलेत, आता काय विचारायचे उरले आहे? त्याचवेळी, न्यायालयात सुनावणीदरम्यान एसआयटीने आशिष मिश्राची 14 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. न्यायालयाने रिमांड कालावधीत काही अटीही घातल्या आहेत. पहिली अट अशी आहे की, आशिष मिश्राचे मेडिकल केले जाईल. चौकशी दरम्यान त्याला बळजबरी केली जाणार नाही आणि या दरम्यान त्याचे वकील उपस्थित राहतील.

अजय कुमार मिश्रा माध्यमांपासून दूर

दुसरीकडे, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा ‘टेनी’ रविवारी सकाळी त्यांच्या कार्यालयात पोहोचले, पण त्यांनी माध्यमांपासून थोडं अंतरच ठेवलं. त्यांनी या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला. याआधी अजय मिश्रा हे दरवेळी माध्यमांसमोर येत होते, आणि आपला मुलगा कसा निर्दोष आणि शेतकरी कसे दोषी हे वारंवार सांगत होते.

विरोधकांकडून गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

विरोधी पक्षांनी लखीमपूर घटनेवरून सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आणि केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. रविवारी वाराणसीच्या एका रॅलीमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी वाड्रा यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांना तातडीने हटवण्याची मागणी केली. प्रियंका म्हणाल्या की, “आम्ही घाबरणारे लोक नाही, आम्ही महात्मा गांधींवर विश्वास ठेवणारे लोक आहेत”

इतर बातम्या :

‘आघाडी सरकारला लखीमपूरच्या शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम, लातूरच्या आंदोलक शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष’

आज वसुली चालू आहे की बंद? अमृता फडणवीसांचा खोचक सवाल, आता रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर

Ashish Mishra has been remanded in police custody for three days

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.