लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात केलं दाखल
भारताचे माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना मंगळवारी सकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना न्यूरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज सकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपोलो हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागात त्यांना दाखल करण्यात आलंय. रुग्णालयाने सांगितले की, त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. 96 वर्षीय अडवाणी यांना वया अधिक झाल्याने आरोग्याच्या समस्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
अडवाणी यांना यावर्षीचा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आलाय. प्रकृतीच्या कारणाने ते राष्ट्रपती भवनात उपस्थित राहू शकले नव्हते, त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 30 मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि लालकृष्ण अडवाणी यांचे कुटुंबीय या औपचारिक सोहळ्याला उपस्थित होते.
Veteran BJP leader LK Advani was admitted to the Neurology department today morning at Indraprastha Apollo Hospital. He is stable and under observation: Apollo Hospital
(File pic) pic.twitter.com/N5yQ4bDvsn
— ANI (@ANI) August 6, 2024
2015 मध्ये अडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. लालकृष्ण अडवाणी हे 2002 ते 2004 पर्यंत भारताचे 7 वे उपपंतप्रधान होते. ते भारतीय जनता पक्षाच्या सह-संस्थापकांपैकी एक आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवकाचे सदस्य आहेत. लालकृष्ण अडवाणी हे 1998 ते 2004 या काळात सर्वाधिक काळ गृहमंत्री राहिले.
लोकसभेत सर्वाधिक काळ विरोधी पक्षाचे नेते आहेत. अयोध्या राम मंदिर आंदोलनात त्यांनी प्रमुख नेत्याची भूमिका बजावली होती. अडवाणींनी 25 सप्टेंबर 1990 रोजी गुजरातमधील सोमनाथ येथून पहिली राम रथयात्रा सुरू केली जी अयोध्येत संपली. या प्रवासातून त्यांनी राम मंदिर आंदोलन लोकांपर्यंत नेले.