जामिन मिळून 10 दिवस उलटल्यानंतरही लालूंची तुरुंगातून सुटका नाही
जामीन मिळाल्यामुळे त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र कोरोना संसर्गामुळे सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे ते तुरुंगातून प्रत्यक्ष बाहेर पडू शकलेले नाहीत. (Lalu has not been released from jail even after 10 days of bail)
रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामिन मिळून दहा दिवस उलटले तरी त्यांची अजून तुरुंगातून सुटका झालेली नाही. झारखंडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संखया वाढल्यानंतर बार काऊन्सिलने काही दिवसांसाठी न्यायालयीन कामकाजाच्या ठिकाणी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने लागू केलेल्या निर्बंधांचे बार काऊन्सिलकडून पालन केले गेले आहे. निर्बंध शिथील होऊन बार काऊन्सिलचे काम 3 मे रोजी पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी लालूप्रसाद यांना तुरुंगाबाहेर पडण्याची संधी मिळणार आहे. (Lalu has not been released from jail even after 10 days of bail)
चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा
लालूप्रसाद हे कोट्यवधींच्या चारा घोटाळ्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांना नुकताच झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यामुळे त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र कोरोना संसर्गामुळे सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे ते तुरुंगातून प्रत्यक्ष बाहेर पडू शकलेले नाहीत. न्यायालयाने त्यांना दुमका ट्रेजरी प्रकरणात 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. याचवेळी त्यांना 10 लाखांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाच्या काही शर्थी-अटीनुसार मंजुरीविना त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही.
कोरोनामुळे बार काऊन्सिलचे काम ठप्प
देशाच्या इतर भागांप्रमाणेच झारखंडमध्येही कोरोनाच्या रुग्णसंखयेत मोठी वाढ झाली. त्यामुळे राज्यातील सर्व प्रशासनाची चिंता वाढली. याच पार्श्वभूमीवर झारखंड बार काऊन्सिलने संपूर्ण राज्यातील वकिलांना 2 मेपर्यंत सर्व प्रकारच्या न्यायालयीन कामकाजापासून दूर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये लालूप्रसाद यांच्या जातमुचलक्याची रक्कम भरण्याची तसेच त्यांच्या सुटकेच्या आदेशाची प्रत घेण्याची कार्यवाही पूर्ण होऊ शकलेली नाही. सीबीआय न्यायालयाने त्यांना सात-सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. वेगवेगळ्या कलमांतर्गत ही शिक्षा ठोठावली होती. लालूप्रसाद यांनी तुरुंगवासाच्या शिक्षेचा निम्मा कालावधी पूर्ण केला नसल्याचा दावा सीबीआयने केला होता. लालूप्रसाद यांना याआधी चारा घोटाळ्याशीच संबंधित असलेल्या चाईबासा आणि देवघर प्रकरणात जामीन मिळाला आहे. (Lalu has not been released from jail even after 10 days of bail)
मुंबईत आत्महत्या करणाऱ्या मुलीला पोलिसांनी रोखलं, विश्वास नांगरे पाटलांकडून कौतुक#mumbaipolice #taddevpolice #coronalockdown #maharashtralockdown https://t.co/rJn64EgHli
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 27, 2021
इतर बातम्या
धक्कादायक! पत्नीच्या निधनाचे वृत्त समजताच काही तासातच पतीनेही सोडले प्राण
कोरोना संकटात प्रशासनानं आघाडीवर राहून सहकार्य करावं, राज्यपालांची सर्व विद्यापीठांनी सूचना