Video: हिमाचलमध्ये भयानक भूस्खलन, थरारक घटनेत क्षणार्धात लोखंडी ब्रीज कोसळला, 9 मृत्यू
हिमाचल प्रदेशमध्ये भयानक भूस्खलन झालंय. या थरारक घटनेत क्षणार्धात लोखंडी ब्रीज कोसळला. विशेष म्हणजे ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
धर्मशाळा : हिमाचल प्रदेशमध्ये भयानक भूस्खलन झालंय. या थरारक घटनेत क्षणार्धात लोखंडी ब्रीज कोसळला. विशेष म्हणजे ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. या व्हिडीओत डोंगरावर भूस्खलन झालेलं दिसतंय. दरड कोसळून खाली आलेले दगड अवघ्या काही सेकंदात हा संपूर्ण लोखंडी ब्रीज उद्ध्वस्त करताना दिसत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 9 पर्यटकांचा मृत्यू झालाय.
#WATCH | Himachal Pradesh: Boulders roll downhill due to landslide in Kinnaur district resulting in bridge collapse; vehicles damaged pic.twitter.com/AfBvRgSxn0
— ANI (@ANI) July 25, 2021
हिमाचल प्रदेशच्या किन्नोर जिल्ह्यात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 9 पर्यटकांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण जखमी झालेत. मृत्यू झालेले पर्यटक दिल्लीतून किन्नोरला फिरण्यासाठी आले होते. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे.
डोंगरावरुन मोठमोठे दगड खाली घसरत येत असताना पर्यटकांनी भरलेली एक गाडी छितकुलवरुन सांगलीकडे चालली होती. त्या गाडीतील प्रवाशांना काही समजण्याआधीच गाडीवर दगड कोसळले.
हेही वाचा :
पुण्यात अतिवृष्टीचा फटका, 12 गावं अंधारात, 7 गावांचा संपर्क तुटला, संपूर्ण कोंढरी गाव स्थलांतरीत
पुण्यात कोंढरी गावात दरड कोसळली, भोर महाड रस्त्यावर 30 ठिकाणी भूस्खलन
राज्यात पुराचं संकट, यंदा माझा वाढदिवस साजरा करू नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
व्हिडीओ पाहा :
Land Sliding destroyed bridge in in Himachal Pradesh many dead