लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा; तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार; शिवाजी पार्क येथे होणार अंत्यसंस्कार

आपल्या अलौकीक आवाजाने संपूर्ण जगाला मोहून टाकणाऱ्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा (national mourning) जाहीर करण्यात आला आहे.

लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा; तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार; शिवाजी पार्क येथे होणार अंत्यसंस्कार
भारतरत्न लता मंगेशकर
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 11:35 AM

नवी दिल्ली: आपल्या अलौकीक आवाजाने संपूर्ण जगाला मोहून टाकणाऱ्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा (national mourning) जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशभरात तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. तसेच या दोन दिवसात देशात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आज संध्याकाळी शिवाजी पार्क (shivaji park) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. यावेळी त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात येईल. त्यानंतर अंत्यसंस्कारापूर्वी सशस्त्र जवान त्यांना सलामी देतील. गेल्या 28 दिवसांपासून लता मंगेशकर यांची मृत्यूशी झूंज सुरू होती. या काळात त्यांनी न्यूमोनियावर मातही केली होती. त्यांना कोरोना झाला होता. त्यावरही उपचार सुरू होते. पण त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच आता ब्रीच कँडीतून लतादीदींचे पार्थिव त्यांच्या पेडररोडवरील घरी काही काळ ठेवलं जाणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेेंद्र मोदीही लतादीदींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एका युगाचा अस्त झाल्याची भावना सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

राष्ट्रीय दुखवटा काय असतो?

भारतरत्नाने सन्मानित एखाद्या व्यक्तिचं निधन झालं तर ती देशाची मोठी हानी मानल्या जाते. त्यामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो. यापूर्वी केंद्र सरकारच्या शिफारशीवर राष्ट्रपती याची घोषणा करायचे. मात्र आता राज्य सरकारेही राजकीय शोक जाहीर करत असतात. राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय ध्वज संहितेच्यानुसार संसद, सचिवालय, विधानसभा आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय भवन आणि सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जातो. या शिवाय देशाच्या बाहेरील भारतीय दूतावासावरील राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवला जातो. या काळात कोणतेही सरकारी किंवा औपचारीक कार्यक्रम केले जात नाहीत.

संबंधित बातम्या:

Lata Mangeshkar Nidhan | दीदी गेल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा

Lata Mangeshkar | मी नि:शब्द, लतादीदींच्या जाण्याने देशात पोकळी निर्माण झालीय; मोदी, राष्ट्रपतींसह दिग्गजांकडून शोक व्यक्त

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.