Weekend Curfew | राजधानीत विकेंड कर्फ्यू लागू, नवी नियमावली जारी, नेमकं काय सुरु? काय बंद?
दिल्लीमध्ये विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना रुग्णवाढीचा धोका लक्षात घेऊन देशातील वेगवेगळ्या राज्यात आता पुन्हा एकदा कडक निर्देश जारी केले जात आहेत.
नवी दिल्ली : वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत (Latest Delhi Corona Updates ) नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार दिल्लीमध्ये विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना रुग्णवाढीचा धोका लक्षात घेऊन देशातील वेगवेगळ्या राज्यात आता पुन्हा एकदा कडक निर्देश जारी केले जात आहेत. अशातच दिल्लीत रुग्णवाढ आणि ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेती डीडीएमएने महत्त्वाची बैठक घेऊन विकेंट कर्फ्यू लावण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्याचप्रमाणे नवी नियमावलीही जारी करण्यात आली आहे.
काय आहे दिल्लीतील नवी नियमावली?
दिल्लीमध्ये डीडीएमएची आज बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा दिल्लीत विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबत आणखीही अनेक नियम जारी करण्यात आले आहेत. हे नियम नेमके कोणते आहेत, त्यावर एक नजर टाकुयात…
- सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचे आदेश
- खासगी कार्यालयात विकेंडला फक्त 50 टक्के क्षमतेस कामकाज सुरु ठेवण्यास मुभा
- अनावश्यक आणि विनाकारण घराबाहेर भटकणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश
- दिल्लीत बस आणि मेट्रो पूर्ण क्षमतेनं सुरु राहणार
- मेडिकलसह अत्यावश्यक सेवांवर अद्यापतरी कोणतेही निर्बंध नाहीत
- रात्रीच्या जमावबंदीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
- शैक्षणिक संस्था, व्यायामशाळा आणि सिनेमाघरांसाठीही नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
- राज्ञी दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत दिल्लीत नाईट कर्फ्यू असेल.
दिल्लीत वाढत्या रुग्णसंख्येचा धोका
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही कोरोना रुग्णवाढीचा वेग कमालीचा असल्यानं प्रशासन आता सतर्क झालं आहे. नव्या नियमांसह निर्बंधांचं कठोरपणे पालन व्हावं, यासाठीच्या अंमलबजावणीचे निर्देश आज देण्यात आले आहेत. जानेवारीच्या मध्यापर्यंत दिल्लीतील कोरोना स्थिती आणखी खालावण्याची भीती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत दरदिवशी 20 ते 25 हजारपर्यंत नवे रुग्ण आढळून येण्याची शक्यता आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. याचा ताण दिल्लीतील आरोग्य यंत्रणेवरही होण्याची दाट शक्यता असल्यानं दिल्ली सरकारसह प्रशासनही आता एक्शन मोडमध्ये आलंय.
उपमुख्यमंत्री सिसोदिया काय म्हणाले?
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटलंय की,
दिल्लीतल सध्याच्या घडीला जवळपास 10 हजार सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यातील 350 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर 124 रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची गरज भासली आहे. यातील 7 रुग्ण हे वेंटिलेटरवर आहेत. गरज भासली तरच लोकांनी रुग्णालयात यावं. त्यासोबत शनिवार आणि रविवारी विकेंड कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. लोकांनी त्यांचं काटोकोरपणे पालन करावं.
पाहा व्हिडीओ –
Addressing an important Press Conference | LIVE https://t.co/ikjwaxtJaX
— Manish Sisodia (@msisodia) January 4, 2022
इतर बातम्या –
VIDEO : अंगावर काटा आणणारा व्हिडीओ! चक्क एका मुलीने घेतली चित्त्याची किस्स…व्हिडीओ पाहून अवाक व्हाल