Sukhdool Singh : त्याला पापाची शिक्षा मिळाली, पंजाबमध्ये राहून कॅनडात गेम, सुक्खाच्या हत्येची जबाबदारी ‘या’ गँगने घेतली

पंजाबमधून फरार होऊन कॅनडात गेलेल्या गँगस्टर सुक्खाची आज हत्या झाली आहे. अज्ञात लोकांनी गोळ्या घालून त्याला यसमदनी पोहोचवली. त्यामुळे कॅनडासह भारतात खळबळ उडाली आहे. त्याची हत्या कुणी केली असा सवाल केला जात आहे.

Sukhdool Singh : त्याला पापाची शिक्षा मिळाली, पंजाबमध्ये राहून कॅनडात गेम, सुक्खाच्या हत्येची जबाबदारी 'या' गँगने घेतली
Sukhdool Singh Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 11:54 AM

चंदीगड | 21 सप्टेंबर 2023 : खलिस्तानी समर्थक आणि गँगस्टर सुक्खा ऊर्फ सुखदूल दुनुके सिंग याची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात लोकांनी कॅनडात त्याची गोळ्या घालून हत्या केली आहे. सुक्खा हा खलिस्तानी समर्थक होता. खलिस्तान्यांना आर्थिक रसद पोहोचवण्याचं काम तो करत होता. पण त्याचा कॅनडातच गेम वाजल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सुक्खाच्या हत्येची जबाबदारी भारतातील एका बड्या गँगने घेतली आहे. त्यामुळे आणखीनच खळबळ उडाली आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगने सुक्खाच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. फेसबुक पोस्ट करून ही जबाबदारी घेतली आहे. तसेच कॅनडातून पळून जा. नाही तर तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा मिळालीच म्हणून समजा, अशी धमकीही या फेसबुक पोस्टमधून देण्यात आली आहे.

काय आहे फेसबुक पोस्ट?

हां जी. संत श्री अकाल. राम राम. हा सुक्खा दुनिके हा बंबिहा ग्रुपचा इंचार्ज बनून फिरत होता. कॅनडाच्या विनिपेग शहरात त्याचा खून झाला आहे. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई ग्रुप घेत आहे. या ड्रग्स एडिक्टेड नशेडीने केवळ नशा करण्यासाठी आणि पैशासाठी अनेकांची घरे उजाडली होती. आमचे बंधू गुरलाल बराड, विक्की मिद्दुखेडा यांच्या हत्येत त्याचा हात होता.

बाहेर राहून त्याने यांची हत्या केली. संदीप नंगल अंबियाची हत्याही त्यानेच केली होती. आता त्याला त्याच्या पापांशी शिक्षा मिळाली आहे. फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. एखाद दुसरे कोणी कॅनडात राहिले असतील तर त्यांनी जिथे वाटेल तिथे पळून जावं. जगातील कोणत्याही देशात पळून जा. आमच्याशी पंगा घेऊन तुम्ही वाचाल असा विचारही करू नका. वेळ कमी अधिक होईल. पण सर्वांना शिक्षा मिळेल, असं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

वाँटेड होता

सुक्खा हा पंजाबमधून फरार झालेला गँगस्टर होता. एनआयएच्या लिस्टमध्ये यादीत ए कॅटेगिरीतील गँगस्टरच्या यादीत त्याचं नाव होतं. त्याची आज कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. खलिस्तानी अतिरेकी अर्शदीप सिंग ऊर्फ अर्श डाला याचा तो उजवा हात होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.