वाढदिवसाच्या आधीच संपवू, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून या खासदाराला धमकी

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा माणूस असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानातून हा धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्याने सांगितले की, गोल्डी ब्रार यांनी त्यांना फोन करण्यास सांगितले होते. खासदार यादव झारखंड निवडणुकीत प्रचार करत आहेत.

वाढदिवसाच्या आधीच संपवू, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून या खासदाराला धमकी
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 7:31 PM

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा माणूस असल्याचे सांगून त्याने पाकिस्तानातून फोन करत पप्पू यादव यांना धमकी दिली आहे. गोल्डी ब्रारने त्यांना धमकी देण्यास सांगितल्याचे त्याने म्हटले होते. पप्पू यादव हे सध्या झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्यासाठी प्रचार करत आहेत. या दरम्यान त्यांना सतत जीवे मारण्याची धमकी येत आहे. याआधी नेपाळमधून फोन करून त्यांना धमकी देण्यात आल्याचे पप्पू यादव यांनी सांगितले होते.

24 डिसेंबरला पप्पू यादव यांचा वाढदिवस आहे. पण त्याआधीच त्यांना मारले जाईल असे फोन करणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली आहे. धमकी देणारा व्यक्ती म्हणत आहे की, गोल्डी भाईने आपल्याला फोन करण्यास सांगितले आहे. रविवारीही त्याने फोन केला होता, मात्र पप्पू यादवने फोन उचलला नाही.

पप्पू यादव यांनी सांगितले की, गुन्हेगार वारंवार त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख करत होता. पण त्यांनी गुन्हेगाराला ताकीद दिली की त्याने आपल्याला पाहिजे तितकी रेकी करावी, परंतु आपल्या कुटुंबाला मध्ये आणू नये. त्यांचा लढा माझ्या विचारसरणीशी, सरकारी यंत्रणेशी असेल तर त्यांनी आम्हाला मारून टाकावे, असे ते म्हणाले. परंतु, जेव्हा कुटुंबाची चर्चा केली जाते तेव्हा त्याचे मार्ग वेगळे असतील. पप्पू यादव यांनी धमकीचा ऑडिओ सरकारला पाठवला आहे.

आठवडाभरापूर्वीही पप्पू यादव यांनी कुरिअरमधून धमकीचे पत्र आले होते. १५ दिवसांत दिल्लीतील अर्जुन भवन उडवले जाईल, असे सांगण्यात आले. याआधीही त्यांना अनेकदा धमकीचे फोन आणि मेसेज आले होते. काही काळापूर्वी पोलिसांनी महेश पांडे याला दिल्लीतून अटक केली होती, ज्याने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने त्यांना धमक्या दिल्या होत्या. मात्र, महेश पांडेचा लॉरेन्स बिश्नोईशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

अनमोल बिश्नोईला अटक

दरम्यान अशी माहिती समोर येत आहे की, लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो मोस्ट वॉन्टेड आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अमेरिकेला प्रस्ताव पाठवल्याची देखील माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या या प्रस्तावानंतर त्याला अमेरिकेत अटक झाल्याचं बोललं जात आहे.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....