‘लॉरेन्स बिश्नोईला मला मारायचं असेल तर त्याने लवकर मारुन टाकावं’, खासदार पप्पू यादव यांचं वक्तव्य

"लॉरेन्स बिश्नोईचा फोन आला तेव्हा मी त्याला सांगितलं की, त्याला कुणाला मारायचं आहे ते त्याचं काम आहे. लॉरेन्सला सलमान खानला मारायची इच्छा आहे तर मारुन टाक. मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. सलमानला वाचवायचं किंवा न वाचवायचं याबाबत सरकारची जबाबदारी आहे", असं पप्पू यादव म्हणाले.

'लॉरेन्स बिश्नोईला मला मारायचं असेल तर त्याने लवकर मारुन टाकावं', खासदार पप्पू यादव यांचं वक्तव्य
'लॉरेन्स बिश्नोईला मला मारायचं असेल तर त्याने लवकर मारुन टाकावं', खासदार पप्पू यादव यांचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 6:52 PM

बिहारचे अपक्ष खासदार पप्पू यादव सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. पप्पू यादव यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नोईला दोन टक्क्याचा किरकोळ गुन्हेगार म्हटलं होतं. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर त्यांना वेगवेगळ्या फोन नंबरवरुन जीवे मारण्याची धमकी येत आहे. या धमकीवर अखेर पप्पू यादव यांनी मौन सोडलं आहे. “माझं कुणासोबत शत्रूत्व नाही. तसेच मला कुणाची भीती देखील वाटत नाही. लॉरेन्सला मला मारायचं असेल तर त्याने मला मारुन टाकावं. मी तुम्हाला रोखत नाहीय. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत की, मी घाबरलो आहे. भाई मला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या माध्यमातून मारुन टाका”, असं पप्पू यादव म्हणाले.

“माझी इच्छा आहे की, मी लवकर मरावं, जेणेकरुन हिंदुस्तानातून सत्य गायब होऊन जाणार. मी सर्व काही सोडू शकतो. पण घाबरुन आयुष्य जगायची मला सवय नाही. मी आपल्या विचारधारेशी तडजोड करु शकत नाही”, असं पप्पू यादव म्हणाले. “लॉरेन्स बिश्नोईचा फोन आला तेव्हा मी त्याला सांगितलं की, त्याला कुणाला मारायचं आहे ते त्याचं काम आहे. लॉरेन्सला सलमान खानला मारायची इच्छा आहे तर मारुन टाक. मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. सलमानला वाचवायचं किंवा न वाचवायचं याबाबत सरकारची जबाबदारी आहे”, असं पप्पू यादव म्हणाले. तसेच “लोकांनी माझ्या सुरक्षेची चिंता करु नये. मला दोन दिवसांपूर्वीच धमकी देण्यात आली, तेव्हा मी झारखंडहून नुकतंच पूर्णिया आलो होतो”, अशी प्रतिक्रिया पप्पू यादव यांनी दिली.

पप्पू यादव यांनी बिश्नोई गँगला आधी काय म्हटलं होतं?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पप्पू यादव यांनी बिश्नोई गँगवर निशाणा साधला होता. त्यांनी लॉरेन्स बिश्नोईला किरकोळ गुन्हेगार म्हटलं होतं. “मला जर पोलिसांनी सहमती दिली तर मी 24 तासात संपूर्ण गँगला संपवून टाकणार. एक गुन्हेगार जेलमध्ये बसून आव्हान देत लोकांना मारत आहे आणि सर्व मुक्याने पाहत आहेत”, अशा तिखट शब्दांत पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नोईवर टीका केली होती. त्यानंतर बिश्नोई गँगकडून पप्पू यादव यांना वारंवार धमकी दिली जात आहे.

हे सुद्धा वाचा

पप्पू यादव यांना बिश्नोई गँगच्या शूटरची धमकी

बिश्नोई गँगच्या एका शूटरने पप्पू यादव यांना फोन करुन धमकी दिली. “कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलताना विचार करुन बोलावं. तुमचं बिश्नोई भाऊ सोबत काय शत्रूत्व आहे?”, असं शूटर पप्पू यादव यांना म्हणाला होता. “आम्हाला कर्म आणि कांड दोन्ही माहिती आहेत”, असं शूटर म्हणाला. यावेळी पप्पू यादव त्याला आपण 7 वेळा खासदार म्हणून निवडून आल्याचं सांगतात. त्यावर तो शूटर आम्हाला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. आमच्या रस्त्यात जो येईल त्याला परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी पप्पू यादव यांना देण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?.
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्....
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्.....
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'.
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार.
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन.
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'.
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?.
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'.
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट.
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल.