Shark Tank शोचे जज Ashneer Grover यांच्या अडचणीत वाढ, BharatPe कंपनीकडून खटला दाखल

| Updated on: Dec 09, 2022 | 7:06 PM

भारतपे कंपनीचे को फाऊंडर अश्नीर ग्रोव्हर यांच्या विरुद्ध कंपनीने सिंगापूरमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Shark Tank शोचे जज Ashneer Grover यांच्या अडचणीत वाढ, BharatPe कंपनीकडून खटला दाखल
Follow us on

मुंबई : भारतपे (BharatPe) कंपनीचे सह-संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांचा वाद आता सिंगापूरपर्यंत पोहोचला आहे. याआधी कंपनीने अश्नीर ग्रोवर यांना दोन प्रकरणात अडचणीत आणलं आहे. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात दिवाणी खटला दाखल आहे, तर आर्थिक गुन्हे शाखेत फौजदारी खटलाही सुरू आहे.

भारत पे कंपनीने सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राकडे कंपनीचा हिस्सा आणि अश्नीर ग्रोव्हर यांच्याकडे असलेले सह-संस्थापक पद काढून घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. सध्या कंपनीचे हे शेअर्स प्रतिबंधित श्रेणीत आहेत.

अश्नीर ग्रोव्हर यांना फटका बसणार

Ashneer ग्रोव्हर यांच्याकडे BharatPe मध्ये सुमारे 8.5 टक्के हिस्सा आहे. यापैकी 1.4 टक्के शेअरहोल्डिंग प्रतिबंधित श्रेणीत आहे. या श्रेणीतील शेअरहोल्डिंग म्हणजे कंपनीचे कर्मचारी म्हणून मिळालेले शेअरहोल्डिंग हस्तांतरित केले जाऊ शकत नाही.

भारत पे कंपनीने सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राच्या नियमांनुसार एक दिवस आधी हा अर्ज दाखल केला आहे. जर भारत पेचा हा अर्ज स्वीकारला गेला, तर अश्नीर ग्रोव्हरला कंपनीचे समभाग आणि त्याच्याकडे असलेले सह-संस्थापक पद दोन्ही गमवावे लागू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने यापूर्वी अश्नीर ग्रोव्हरला कायदेशीर नोटीस पाठवून हे शेअर्स परत करण्यास सांगितले होते. प्रतिबंधित श्रेणीतील समभागांसाठी, समभागधारकांसोबतच्या करारात ते काढून घेण्याचीही तरतूद आहे. मात्र या लवाद प्रकरणाबाबत भारतपेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

भारतपे आणि ग्रोव्हर्सची लढाई

या वर्षाच्या सुरुवातीला भारतपेने अश्नीर ग्रोव्हरवर कंपनीच्या निधीची उधळपट्टी आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता. यानंतर अश्नीर ग्रोव्हर आणि त्याची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच होत्या.

भारतपेने अलीकडेच ग्रोव्हर दाम्पत्य आणि त्यांच्या तीन नातेवाईकांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. त्याचबरोबर आर्थिक गुन्हे शाखेकडे फौजदारी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. कंपनीने त्याच्याकडे भरपाई म्हणून 88.67 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

एक ऑडिओ व्हायरल झाल्यानंतरच अश्नीर ग्रोव्हर यांच्या अडचणी आणखीच वाढल्या. त्यांनी कोटक बँकेच्या माध्यमातून Nykaa कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक केली होती. शेअर डील पूर्ण न झाल्याने बँकेतील एका कर्मचाऱ्याशी त्यांनी असभ्य भाषेत संभाषण केले. ज्याचा ऑडिओ व्हायरल झाला. त्यातून त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या.

अश्नीर ग्रोव्हर शार्क टँक इंडिया या शोमध्ये जज म्हणून दिसला होता. या शो दरम्यान त्यांनी केलेले अनेक कंमेट देखील चर्चेत राहिले.