राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श; ‘असा’ होता रामभाऊ म्हाळगींचा जीवनप्रवास

रामचंद्र काशीनाथ म्हाळगी (Ramchandra Kashinath Mhalgi) ऊर्फ रामभाऊ म्हाळगी हे आरएसएसचे (RSS) प्रचारक होते. साधारणपणे 1952 -53 च्या सुमारास ते राजकारणात आले. सुरुवातीला भारतीय जनसंघ अर्थात आताचे भाजपच्या (BJP)संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांनी भारतीय जनसंघाच्या प्रचारासाठी आणि संघटात्मक बांधणीसाठी महाराष्ट्रभर प्रवास केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श; 'असा' होता रामभाऊ म्हाळगींचा जीवनप्रवास
रामभाऊ म्हाळगीImage Credit source: maharashtra times
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 5:40 AM

रामचंद्र काशीनाथ म्हाळगी (Ramchandra Kashinath Mhalgi) ऊर्फ रामभाऊ म्हाळगी हे आरएसएसचे (RSS) प्रचारक होते. साधारणपणे 1952 -53 च्या सुमारास ते राजकारणात आले. सुरुवातीला भारतीय जनसंघ अर्थात आताचे भाजपच्या (BJP)संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांनी भारतीय जनसंघाच्या प्रचारासाठी आणि संघटात्मक बांधणीसाठी महाराष्ट्रभर प्रवास केला. रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कुडूस गावामध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी कुडूसमध्ये, तर माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. रामभाऊ विद्यार्थी दशेतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. मद्रास व सोलापूर येथे त्यांनी संघ प्रचारक म्हणून काम केले. येथूनच त्यांच्या सार्वजनिक जीवनाला एका अर्थाने प्रारंभ झाला. पुढे त्यांनी गोवा विमोचन समितीच्या कार्यकारी समितीचे सचिव, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या जनरल काउन्सिलचे सदस्य, महाराष्ट्र दुष्काळ निवारण समितीच्या जनरल काउन्सिलचे सदस्य म्हणूनही काम केले.

जनसंघाकडून विधानसभेत निवडून जाणारे पहिले आमदार

जनसंघाची स्थापना झाल्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाणारे ते पहिलेच आमदार होते. पुढे ते आपल्या कार्याच्या जोरावर जनसंघचे प्रदेशाध्यक्ष देखील बनले. त्यांची जडणघडणच संघाच्या मुशीत झाले. त्यांच्यावर विद्यार्थी दशेतच संघाचे संस्कार झाले. महाराष्ट्रात संघाची विचारसरणी रुजवण्यात रामभाऊ म्हाळगींचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या ठाई असलेली अभ्यासू वृत्ती. सुसंस्कृतपणा व साधेपणामुळे त्यांना जनसंघाचे द्रोणाचर्य म्हणून ओळखले जायचे. सत्तरच्या दशकात जनसंघाचे केवळ चारच आमदार विधानसभेत होते. त्यामध्ये रामभाऊ म्हाळगी यांचा समावेश होतो. जनसंघाचे जरी चारच आमदार असले तरी देखील रामभाऊ म्हाळगी यांचा त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे विधनसभेत मोठा दबदबा होता. पुण्याहून निवडून गेलेल्या रामभाऊ म्हाळगी हे बोलू लागले की, सर्व सभागृह शांत असायचे त्यांच्या भाषणात कधीही गोंधळ होत नव्हता.

कुशल संसदपटू

कुशल संसदपटू आदर्श लोकप्रतिनिधी आणि तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते यासोबतच संघ प्रचारक म्हणून रामभाऊ म्हाळगी यांना ओळखले जायचे. ते 1957, 1967 आणि 1972 असे तीन वेळा भारतीय जनसंघाकडून विधानसभेत आमदार तर 1977 व 1980 असे दोन वेळा ठाणे मतदार संघातून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले. याचसोबत ते मध्य रेल्वे स्टेशन मास्टर्स संघटनेचे उपाध्यक्ष आणि पुणे बार काउंन्सिलचे उपाध्यक्ष देखील होते. रामभाऊ म्हाळगी यांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनसंघ महाराष्ट्रात वाढवण्याचे काम केले.

महत्त्वाच्या बातम्या

फोन टॅपिंगचे आदेश देणारे ‘बिग बॉस’ कोण? गुजरात मॉडेल मुळासकट उखडून फेकण्याची गरज-काँग्रेस

Aurangabad | भाजपचे संजय केणेकर यांची म्हाडाच्या सभापतीपदी फेरनिवड, कोर्टाचे आदेश काय?

आधी मुख्यमंत्री असताना आणि नंतर गोव्याचे प्रभारी असताना फोन टॅपिंगचा आरोप, आता फडणवीसांचं थेट उत्तर

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.