Seema Haider | सीमा सचिनसाठी भारतात आली, तर दोन मुलांची आई अंजूने नसरुल्लासाठी पाकिस्तान गाठलं
Seema Haider | भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू कोण आहे? काय आहे तिची कथा? पाकिस्तानात जाण्यासाठी तिने कसं प्लानिंग केलं? घरी नवऱ्याला तिने काय सांगितलं? तिची दोन मुलं किती वर्षाची आहेत? जाणून घ्या सर्वकाही.
नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नोएडामध्ये राहणाऱ्या प्रियकर सचिन मीणासाठी ती भारतात आली. आज तिची सर्वत्र चर्चा आहे. आता अशीच एक गोष्ट समोर आलीय. पण यावेळी बॉर्डर पार करणारी प्रेमिका भारतातून आहे. राजस्थानात राहणारी दोन मुलांची आई अंजूने फेसबुक फ्रेंडसाठी बॉर्डर पार केली. अंजू आता पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये आहे.
तिथे आता अंजूच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अंजूची कथा सुद्धा सीमाशी मिळती-जुळती आहे. हे सर्व कसं सुरु झालं, ते समजून घ्या.
कशी झाली ओळख?
अंजूचा नवरा आणि 2 मुलं भिवाडीमध्ये राहतात. अंजू काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात गेली. खैबर पख्तूनख्वामध्ये राहणाऱ्या नसरुल्लाला भेटण्यासाठी ती तिथे गेली. दोघांची फेसबुकवरुन मैत्री झाली होती. दोस्तीसाठी अंजूने सीमा ओलांडली. मूळात म्हणजे कोणालाच या बद्दल काही कळलं नाही.
अंजू काय सांगून घरातून बाहेर पडलेली?
अंजू जयपूरला जाते सांगून घरातून निघाली होती. पण ती थेट पाकिस्तानला निघून गेली. 3 दिवसानंतर तिने नवऱ्याला फोन करुन आपण पाकिस्तानात असल्याची कल्पना दिली. मैत्रिणीला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेल्याचा तिने सांगितलं. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. आता मीडिया रिपोर्ट्समधून अंजू तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेल्याच समोर येतय. तिथे पाकिस्तानात नसरुल्ला आणि अंजूच लग्न होणार आहे.
अंजूने कसं केल प्लानिंग?
अंजूने तिच्या जुन्या पत्यावरच पासपोर्ट बनवला. अंजूने फोनवरच्या चर्चेत 3-4 दिवसात भारतात परतणार असल्याच सांगितलं. अंजूने पाकिस्तानात जाण्यासाठी एक नवीन सीम कार्ड विकत घेतलं होतं. या बद्दल कोणालाच काही माहित नव्हतं. अंजूला 15 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षांचा मुलगा आहे.
पाकिस्तानी व्हिसासाठी कधीपासून अर्ज करत होती?
पाकिस्तानी मीडियामध्ये अंजू नसरुल्ला सोबत साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे. 35 वर्षाची अंजू मागच्या दोन वर्षांपासून पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज करत होती. नसरुल्लाच्या प्रेमात कशी पडली?
दोन वर्षांपूर्वी फेसबुकवरुन अंजू बरोबर ओळख झाली होती, असं नसरुल्लाने सांगितलं. दोघांची आधी मैत्री झाली, मग प्रेम झालं. प्रेमासाठी अंजूने सीमा ओलांडली.