लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकट असल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने दारुवर सेस लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तळीरामांना आता दारुवर 10 ते 40 रुपये ज्यादा मोजावे लागणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने अबकारी धोरणात बदल करून हे शुल्क वाढवलं आहे. त्यामुळे प्रति 90 ml दारुवर तळीरामांना आता दहा रुपये मोजावे लागणार आहेत.(liquor price goes up in uttar pradesh due to covid cess)
कोविड सेसच्या माध्यमातून सरकारला राज्याचा महसूल वाढवायचा आहे. त्यातून होणाऱ्या मिळकतीचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढण्यास उपयोग होणार आहे. याबाबतचा शासन आदेश कालच सोमवारी जारी करण्यात आला आहे. दारुचे भाव वाढल्याने तळीरामांना मात्र फटका बसला आहे.
किती भाव वाढणार?
उत्तर प्रदेशात दारुवर कोविड सेस आकारल्या गेल्याने दारुच्या किंमतीत 10 ते 40 रुपयांची वाढ होणार आहे. प्रिमीयम कॅटेगिरीच्या दारुवर प्रति 90ml ला दहा रुपये मोजावे लागणार आहेत. सुपर प्रिमीयमवरील प्रति 90ml वर 20 रुपये आणि स्कॉचवरील प्रति 90 ml वर 30 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याशिवाय इंपोर्टेड दारुवरील प्रति 90ml वर 40 रुपये कोविड सेस आकारला जाणार आहे.
दुसऱ्यांदा वाढ
यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने 1 एप्रिल रोजी दारुचे दर वाढवले होते. यूपी सरकारने स्कॉच, वाईन, व्हिस्की आणि व्होडका सहीत सर्व दारुंवरील परमिट शुल्कात वाढ केली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशात विदेशी दारुंच्या किंमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर बियरच्या किंमती 10 ते 20 रुपयांनी कमी झाल्या होत्या. (liquor price goes up in uttar pradesh due to covid cess)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 4 May 2021 https://t.co/PdgX6SbbGw
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 4, 2021
संबंधित बातम्या:
याद राखा, बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीला यायचंच आहे; भाजपच्या खासदाराची धमकी
बंगालनंतर भाजपला उत्तर प्रदेशातही झटका; पंचायत निवडणुकीत अखिलेशच्या सपाचा बोलबाला
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकच उपाय, देशव्यापी लॉकडाऊन करा; राहुल गांधी यांची मागणी
(liquor price goes up in uttar pradesh due to covid cess)