राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणी यांचा अयोध्या दौरा रद्द, कारण…

ram mandir pran pratishtha | 'मंदिर वही बनायेंगे'चा नारा देऊन लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर आंदोलन सुरु केले. लालकृष्ण अडवाणी यांनी हे आंदोलन सर्वसामान्यांपर्यंत नेले होते. परंतु राम मंदिर सोहळ्याला आज ते जाणार नाहीत.

राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणी यांचा अयोध्या दौरा रद्द, कारण...
lalkrishna advani
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 11:53 AM

अयोध्या, दि.22 जानेवारी 2024 | भारतीय जनता पक्षाचे बडे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 1990 च्या दशकात राम मंदिर आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1990 साली भाजपने गुजरातमधील सोमनाथ येथून राम रथयात्रा काढली होती. ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा देऊन लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर आंदोलन सुरु केले. लालकृष्ण अडवाणी यांनी हे आंदोलन सर्वसामान्यांपर्यंत नेले होते. यामुळेच विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार आणि इतर अधिकारी स्वतः लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. परंतु लालकृष्ण अडवाणी आणि भाजपचे दुसरे बडे नेते मुरली मनोहर जोशी प्राणप्रतिष्ठा समारंभात येणार नाही.

का येणार अडवाणी, जोशी

लालकृष्ण अडवाणी हे 96 वर्षांचे आहे. मुरली मनोहर जोशी यांचे वय 90 वर्ष आहे. अयोध्येतील वातावरण थंड आहे. यामुळे प्रकृतीच्या कारणावरुन दोन्ही नेत्यांनी अयोध्येत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अडवाणी यांनी म्हटले की, भव्य सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी मिळाली ही भाग्याची गोष्ट आहे. श्री रामाचे मंदिर हे केवळ पूजेचे मंदिर नाही. या देशाचे पावित्र्य आणि या देशाच्या प्रतिष्ठेच्या स्थापनेचे हे निमित्त आहे, असे अडवाणी यांनी म्हटले.

ही भाग्याची गोष्ट..

अडवणी यांनी म्हटले की, दीर्घ प्रतिक्षेनंतर आम्ही भारताच्या ‘स्व’ चे प्रतीक पुन्हा तयार केले. ते आपल्या सर्वांच्या प्रयत्नांच्या जोरावर पूर्ण झाले आहे. आपण आपली दिशा शोधण्याचा प्रयत्न अनेक दशकांपासून करत आहोत, आपल्याला ती सापडली आहे आणि ती प्रस्थापित झाली आहे. आता प्रत्येक भारतीच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण देशातील वातावरण मंगलमय झाले आहे. या वेळी आपणास प्रत्यक्ष तिथे हजर राहण्याची संधी मिळणे म्हणजे कुठल्यातरी जन्मात कुठेतरी केलेले चांगले कृत्य केल्याचे फळ आहे.

हे सुद्धा वाचा

अयोध्येत कसे आहे वातावरण

अयोध्येत सकाळी 6 वाजता तापमान 8°C होते. तापमान आणि दृश्यता कमी आहे. हवामान विभागाने आज थंडी असणार असल्याचे म्हटले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कमीत कमी तापमान 7 आणि जास्तीत जास्त तापमान 16 डिग्री सेल्सियस असणार आहे.

Non Stop LIVE Update
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.