लग्नात आहेर आणू नका…पण मत मात्र मोदींना द्या, लग्नपत्रिका व्हायरल

Viral Wedding Card: तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यातील लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे. नंदिकंती नरसिमलू आणि त्यांची पत्नी नंदिकंती निर्मला यांचा मुलगा साई कुमार यांचे 4 एप्रिल रोजी लग्न आहे. साई कुमारचे लग्न महिमा रानी हिच्याशी होत आहे.

लग्नात आहेर आणू नका...पण मत मात्र मोदींना द्या, लग्नपत्रिका व्हायरल
लग्नपत्रिकेतून मोदी यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Follow us
| Updated on: Mar 25, 2024 | 11:54 AM

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरु झाली आहे. या रणधुमाळीत परीक्षा आणि लग्न समारंभही होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते विविध पद्धतीने त्यांचा प्रचार करत आहेत. तेलंगणा आणि मध्य प्रदेशात लग्नपत्रिकेतून अनोखी मागणी करण्यात आली आहे. लग्नात आहेर आणू नका, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मतदान करा. 2019 निवडणुकी मोदी लहर होती. पण 2024 मध्ये सुनामी आली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करायचे आहे, असा मेसेज लग्नपत्रिकेत लिहिला आहे.

तेलंगणात लग्नपत्रिकेतून आवाहन

तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यातील लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे. नंदिकंती नरसिमलू आणि त्यांची पत्नी नंदिकंती निर्मला यांचा मुलगा साई कुमार यांचे 4 एप्रिल रोजी लग्न आहे. साई कुमारचे लग्न महिमा रानी हिच्याशी होत आहे. लाकडपासून तयार झालेल्या वस्तूंचा व्यवसाय करणारे नरसिमलू यांनी अनोखी लग्नपत्रिका तयार केली आहे. त्या लग्नपत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की नरेंद्र मोदी यांना मतदान करणे हेच आमच्यासाठी महत्वाचे गिफ्ट आहे. नरसिमलू यांच्या दोन मुलींचे यापूर्वी लग्न झाले होते. त्यावेळी त्यांनी काही अपील केली नाही.

हे सुद्धा वाचा

वराचे पिता नरसिमलू यांनी सांगितले की, माझी कल्पना कुटुंबात मांडली तेव्हा सर्वांना खूप आवडली. घरातील सर्व जण म्हणाले की होय असे केले पाहिजे. त्यानंतर मी निमंत्रण पत्रिका वाटण्यास सुरुवात केली आहे. ही लग्नपत्रिका पाहून लोक काही क्षण आश्चर्यचकित होत होते. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरही या लग्नपत्रिकेची खूप चर्चा होत आहे. याबाबत इंटरनेट युजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

उज्जैनमधून अशी केली होती अपील

तेलंगणाप्रमाणे उज्जैनमधील दौलतगंज येथील व्यवसायीक बाबूलाल रघुवंशी आणि जितेंद्र रघुवंशी यांच्या घरात लग्न आहे. बाबूलाल रघुवंशी यांचा मुलगा अश्विन याचे लग्न मार्च महिन्यात झाले आहे. त्यांनी लग्नपत्रिकेत म्हटले होते की, मागील वेळ मोदी लहर होती. परंतु आता सुनामी झाली पाहिजे. २०२४ मध्ये मोदी यांना पंतप्रधान बनवा, असे आवाहन त्यांनी लग्नपत्रिकेत केले होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.