Loksabha Election 2024 | भाजपाचा मोठा निर्णय, मोदींची नवीन टीम, इतक्या खासदारांच कापणार तिकीट

Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने प्रत्येक मतदारसंघाच्या हिशोबाने रणनिती तयार केली आहे. पक्ष अनेक खासदारांच तिकीट कापण्याच्या मूडमध्ये आहे. मागच्या दोन वर्षात भाजपा खासदारांकडून अनेक कामांच रिपोर्ट कार्ड मागण्यात आलय. सर्वे करणाऱ्या एजन्सीकडून प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच रिपोर्ट कार्ड मागण्यात आलय.

Loksabha Election 2024 | भाजपाचा मोठा निर्णय, मोदींची नवीन टीम, इतक्या खासदारांच कापणार तिकीट
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: tv9 Network
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 3:21 PM

Loksabha Election 2024 | केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची नाव निश्चित करण्यासाठी भाजपाला बरच मंथन कराव लागतय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या खासदारांच प्रदर्शन चांगलं नाहीय, त्यांच तिकीट कापण्यासाठी मागे-पुढे पाहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधीच म्हणाले आहेत की, प्रत्येक जागेवर कमळ निवडणूक लढतोय. भाजपाकडून 60 ते 70 विद्यमान खासदारांच तिकीट कापल जाऊ शकतं.

तीनवेळा लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या तसच वय झालेल्या काही खासदारांच्या जागी नवीन चेहरे दिले जातील. जास्त ओबीसी खासदारांचे तिकीट कापले जाणार नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे 303 खासदार निवडून आले होते. यात 85 ओबीसी खासदार आहेत. नमो App वर जनतेकडून खासदारांबद्दल फिडबॅक घेण्यात आला. आपपाल्या भागातील तीन सर्वाधिक लोकप्रिय भाजपा नेत्यांची नाव विचारण्यात आली.

RSS कडून फिडबॅक

मागच्या दोन वर्षांपासून भाजपा खासदारांकडून सतत त्यांच्या कामाचा रिपोर्ट मागितला जातोय. सर्वे करणाऱ्या एजन्सीकडून प्रत्येक लोकसभा क्षेत्राचा रिपोर्ट मागितला आहे. भाजपाशासित राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मंत्र्याची ड्युटी लावण्यात आली आहे. या मंत्र्यांना लोकसभा मतदारसंघाचा दौरा करुन खासदारांच रिपोर्ट कार्ड मागवण्यात आलं आहे. मंत्री आणि संघटनेकडून मिळालेला रिपोर्ट प्रदेश स्तरावर निवडणूक समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. संघटन सरचिटणीस आणि आरएसएसचा फिडबॅक ठेवण्यात आला.

प्रत्येक जागेसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा

दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी प्रत्येक राज्यात कोअर ग्रुपची भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संघटन सरचिटणीस बी एल संतोष यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक जागेसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावाबद्दल चर्चा झाली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.