लोकसभा निवडणूक 2024: अनेक लग्झरी कार, दुबई-लंडनमध्ये अपार्टमेंट… भाजप महिला उमेदवाराकडे १४०० कोटी रुपयांची संपत्ती
Lok Sabha Election 2024 News in Marathi: पल्लवी डेम्पो यांच्याकडे २१७.११ कोटी रुपयांचे बॉण्ड आहे. १२.९२ कोटी बचतमध्ये तर ९.७ कोटी इतर रक्कम आहे. पल्लवी डेम्पो यांनी पुण्यातील एमआयटीमधून एबीएची पदवी घेतली आहे. त्यांच्या लोकसभेच्या जागेवर ७ मे रोजी मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्या अर्जासोबत संपत्ती आणि गुन्ह्याचे वर्गीकरण दिले जात आहेत. भाजपने दक्षिण गोव्यातून उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांची पत्नी पल्लवी डेम्पो यांना उमेदवारी दिली आहे. पल्लवी यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या अर्जासोबत ११९ पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांची पती श्रीनिवास डेम्पोसोबत संपत्ती १४०० कोटी रुपये आहेत. त्यांचा डेम्पो ग्रुप रिअल इस्टेट, जहाज निर्माण, खणण उद्योग, फुटबॉल लीग यामध्ये त्यांची फ्रेंचाइज आहे.
अशी आहे संपत्ती
पल्लवी डेम्पो यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे २५५.४ कोटींची चल संपत्ती आहे. तसेच श्रीनिवास डेम्पो यांच्या कंपन्यांचे सामीत्व असणाऱ्या कंपन्यांचे मूल्य ९९४.८ कोटी आहे. पल्लवी डेम्पो यांची चल संपत्ती २८.२ कोटी आहे. तर श्रीनिवास यांच्या चल संपत्तीचे मूल्य ८३.२ कोटी आहे. देशातील संपत्तीबरोबर त्यांच्या दुबईमध्ये एक अपार्टमेंट आहे. त्याचे मूल्य २.५ कोटी आहे. लंडनमध्ये १० कोटींचे अपार्टमेंट आहे.
अनेक लग्झरी कार
पल्लवी डेम्पो यांच्याकडे तीन मर्सिडीज बेंज कार आहेत. त्याची किंमत क्रमश: १.६९ कोटी, १६.४२ कोटी, २१.७३ कोटी आहे. एक कॅडिलॅक कार आहे. त्याची किंमत ३० लाख आहे. एक महिंद्र थार एसयूवी असून त्याची किंमत १६.२६ लाख आहे. त्यांनी सन २०२२-२३ मध्ये १० कोटी रुपयांचे आयकर रिटर्न दाखल केले आहे. तसेच श्रीनिवास यांनी ११ कोटींचे रिटर्न दाखल केले आहे.
पल्लवी डेम्पो यांच्याकडे २१७.११ कोटी रुपयांचे बॉण्ड आहे. १२.९२ कोटी बचतमध्ये तर ९.७ कोटी इतर रक्कम आहे. पल्लवी डेम्पो यांनी पुण्यातील एमआयटीमधून एबीएची पदवी घेतली आहे. त्यांच्या लोकसभेच्या जागेवर ७ मे रोजी मतदान होणार आहे.