भाजपला नाही मिळाले बहुमत, तर काय आहे प्लॅन B? अमित शाह यांनी दिले थेट उत्तर

Amit Shah on Majority : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. पण जर बहुमताचा आकडा गाठताना दमछाक झाली तर भाजपकडे प्लॅन बी तयार आहे का? या प्लॅन बी बाबत अमित शाह यांनी काय सांगितले?

भाजपला नाही मिळाले बहुमत, तर काय आहे प्लॅन B? अमित शाह यांनी दिले थेट उत्तर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
Follow us
| Updated on: May 17, 2024 | 11:55 AM

लोकसभा निवडणुकीत भाजपचा 400 पारचा नारा गाजला आहे. पूर्ण बहुमताची दवंडी भाजपने अगोदरच दिली आहे. पण जर बहुमताचा आकडा गाठताना दमछाक झालीच तर भाजपकडे प्लॅन बी आहे का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत या प्रश्नाला थेट उत्तर दिले आहे. वृत्तसंस्था ANI ने त्यांची ही मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी अनेक मुद्यांवर रोखठोक बाजू मांडली. मतदानाची घसरलेली टक्केवारी आणि त्याच्या परिणामावर पण त्यांनी मत मत मांडले.

अमित शाह यांचे रोखठोक उत्तर काय

हे सुद्धा वाचा

‘एएनआय’ ला त्यांनी मुलाखत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येतील, याची खात्री असल्याचे अमित शाह म्हणाले. जर भाजप बहुमत गाठू शकलं नाही तर, त्यांच्याकडे प्लॅन बी तयार आहे का? या प्रश्नाला त्यांनी ‘प्लॅन बी तेव्हाच तयार करतात, जेव्हा प्लन ए यशस्वी होण्याची शक्यता 60 टक्क्यांहून कमी असते.’ असं रोखठोक उत्तर दिलं.

400 जागा हव्यात कशाला?

  • भाजपच्या 400 पार नाऱ्यामुळे काही जण नाराज पण झाले. भाजप मित्रपक्षातील अनेकांनी ही धडकी भरवणारी आणि असुरक्षितता निर्माण करणारी घोषणा असल्याचे भाष्य केले आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी 400 जागा हव्या कशाला, याचे उत्तर दिले. भाजपला 400 जागा हव्या असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या सीमा सुरक्षित करायच्या असतील. मजबूत राष्ट्रासाठी 400 जागा हव्यात, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
  • सर्व भारतीयांना वाटते की देश सुरक्षित राहावा. जगात त्याचा सन्मान वाढावा. हा देश समृद्ध व्हावा. देश आत्मनिर्भर व्हावा. हा देश विकसीत व्हावा. गरीब असो वा श्रीमंत, गेल्या 10 वर्षांत भारताचा जगात मान वाढला आहे, हे प्रत्येकाला माहिती असल्याचे ते म्हणाले.

संविधान, घटना बदलण्यावर दिली ही प्रतिक्रिया

भाजपचे सरकार बहुमताने आल्यास संविधान, घटना बदलणार असा आरोप करण्यात येतो. त्यावर अमित शाह यांनी पलटवार केला. भाजपकडे गेल्या 10 वर्षांपासून बहुमत आहे. पण आम्ही असा प्रयत्न कधी केला नाही. माझ्या पक्षाचा बहुमताच्या दुरुपयोग करण्याचा इतिहास नाही. बहुमताचा दुरुपयोग इंदिरा गांधी यांच्यावेळी काँग्रेसने केला होता, असा हल्लाबोल त्यांनी केला.

केजरीवाल यांना क्लीन चीट नाही

केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला. त्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी मत व्यक्त केले. केजरीवाल यांना ही क्लीनचीट नाही. कोर्टाने केवळ निवडणूक प्रचारासाठी 1 जूनपर्यंत त्यांना सोडले आहे. ते जिथे पण जातील, जनतेला मद्यघोटाळाच आठवेल, असा टोला पण त्यांनी लगावला.

ओडिशात सरकार बदलणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ओडिशा आणि काश्मीरबाबत मोठं भाकित केलं. ओडिशात सरकार बदलणार असा दावा त्यांनी केला. काश्मीरमध्ये पूर्वी निवडणुकांवर बहिष्कार टाकल्या जायचा. आता काश्मीरमध्ये मतदान होते. पहिल्यांदा 40 टक्के काश्मीर पंडितांनी मतदान केल्याचा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.