लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मिळाले दोन नवे निवडणूक आयुक्त, कोण आहेत नवे आयुक्त

Adhir Ranjan Chowdhury on New Election Commissioner: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून समितीने निवड केल्याची माहिती लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली.

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मिळाले दोन नवे निवडणूक आयुक्त, कोण आहेत नवे आयुक्त
Election Commission
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 2:45 PM

नवी दिल्ली | 14 मार्च 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने १४ मार्च रोजी दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू (बलविंदर संधू ) यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पॅनेलच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले. आता या नावांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंतिम निर्णय घेतली. त्यानंतर अधिसूचना  काढण्यात येणार आहे. दरम्यान या प्रक्रियेसंदर्भात आपण असंतुष्ट असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले.  निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी नवीन नियुक्तीचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी नवीन कायद्यानुसार पुनर्गठन करण्यात आलेल्या या पॅनेलच्या पहिल्या नियुक्त्या आहेत. भारताच्या सरन्यायाधीशांना सोडून निवड समितीमध्ये आता पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि नियुक्त केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

ज्ञानेश कुमार केरळमधील तर संधू पंजाबचे

ज्ञानेश कुमार हे केरळमधील तर सुखबीर संधू हे पंजाबमधील आहे. सुखविंदर संधू हे उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि NHAI चे चेअरमन राहिले आहेत. ज्ञानेशकुमार १९८८ बॅचचे केरळचे आयएएस अधिकारी आहेत.यापूर्वी ते गृहमंत्रालयात होते. कलम ३७० संदर्भात निर्णय घेताना ते गृहमंत्रालयात होते.

आपल्याकडे दिली होती २१२ नावे

आपल्याकडे २१२ नावे एका दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे रात्रभर मी विचार करत राहिलो. दुसऱ्या दिवशी सहा नावे माझ्याकडे दिली आहे. त्यानंतर आपण या प्रक्रियेबाबत असंतुष्ट असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची नावे समितीने निश्चित केली आहे. आता ही नावे राष्ट्रपतीकडे जातील. त्यानंतर राष्ट्रपती या नावांवर अंतिम मोहोर उमटवतील.

फेब्रुवारीमध्ये अनुप पांडे यांच्या निवृत्तीनंतर आणि गोयल यांच्या राजीनाम्यानंतर, तीन सदस्यीय निवडणूक आयोगामध्ये आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार राहिले होते. गोयल, ज्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत होता, परंतु त्यांनी 9 मार्च रोजी राजीनामा दिला.

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.