Lok Sabha Election Opinion Poll : ना जादू, ना गॅरंटी… पंजाबमध्ये भाजपला जबर धक्का?; ‘या’ पक्षाला बंपर लॉटरी

लोकसभेच्या 543 पैकी 95 जागांवर भाजपची मजबूत पकड आहे. 2009, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या 95 लोकसभा जागांवर विजय मिळवला होता. तर 2009, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दोन वेळा जिंकलेल्या 173 जागा आहेत. तर या तिन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपने एकदाच जिंकलेल्या 76 जागा आहेत. या 76 जागाच भाजपसाठी 2024च्या निवडणुकीत धोक्याची घंटा असल्याचं मानलं जात आहे.

Lok Sabha Election Opinion Poll : ना जादू, ना गॅरंटी... पंजाबमध्ये भाजपला जबर धक्का?; 'या' पक्षाला बंपर लॉटरी
Lok Sabha Election TV9 Opinion Poll Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 1:30 PM

नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू होणार आहे. आज निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर आचारसंहिता लागेल. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षात घडामोडींना वेग येईल. आयाराम गयारामांचीही चलती होणार आहे. त्यामुळे या घडामोडींकडे देशाचं लक्ष लागलेलं असेल. पण त्यापूर्वीच ओपिनियन पोल आला आहे. या पोलमध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. खास करून पंजाबमधील निकाल आश्चर्यकारक असणार आहे. अवघ्या एक खासदार असलेल्या आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये प्रचंड यश मिळताना दिसत आहे.

टीव्ही9 भारतवर्षने ओपिनियन पोल जारी केला आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा विजय मिळताना दिसत आहे. तर इंडिया आघाडीला मोठा फटका बसताना दिसत आहे. या उलट पंजाबमध्ये भाजप आणि काँग्रेसला जोर का धक्का बसणार असून आम आदमी पार्टीला प्रचंड यश मिळताना दिसत आहे. पंजाबमधूनच आपला 2019मध्ये एक जागा मिळाली होती. आपचा देशात केवळ एकच खासदार निवडून आला होता. मात्र, आता हे चित्र बदलताना दिसत आहे. आपला मोठं यश मिळणार असल्याने राष्ट्रीय राजकारणातील आपचं महत्त्व वाढणार असल्याचंही दिसून येत आहे.

काँग्रेसला भोपळा

टीव्ही9 ओपिनियन पोलनुसार आपला आश्चर्यकारक विजय मिळताना दिसत आहे. राज्यातील 13 जागांपैकी आपला 11 जागांवर विजय मिळताना दिसत आहे. तर भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला केवळ दोनच जागा मिळताना दिसत आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस स्वबळावर लढत आहे. पण काँग्रेसचं खातंही उघडताना दिसत नाहीये. अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीलाही पंजाबमध्ये फारसं यश मिळताना दिसत नाहीये. देशात दलितांची सर्वाधिक संख्या पंजाबमध्ये आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपच्या मागे दलित समाज उभा राहताना दिसत आहे.

बिहारमध्ये लालूंना झटका

ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांना मोठा झटका बसताना दिसत आहे. राज्यातील 40 जागांपैकी 38 जागांवर भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला दोन जागा मिळताना दिसत आहे. म्हणजेच लालू प्रसाद यादव यांच्या राजदला एकही जागा मिळताना दिसत नाहीये. बिहारच्या 40 पैकी 17 जागांवर भाजपला आणि 15 जागांवर नितीश कुमार यांना विजय मिळताना दिसत आहे. लोकजनशक्ती पार्टीला पाच जागांवर विजय मिळताना दिसत असून जीतन राम मांझी यांच्या हम पार्टीला केवळ एका जागेवर विजय मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 2019 मध्येही राज्यात आरजेडीचं खातं उघडलं नव्हतं.

आमचा पोल वेगळा का?

आमच्या पोलची सँपल साईज 20 लाख आहे. PEOPLE’S INSIGHT, POLSTRAT आणि TV9 चा सर्वाधिक विश्वसनीय गॅरंटीवाला ओपिनियन पोल आहे.

देशातील सर्व 543 जागांचा ओपिनियन पोल आहे

एक लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभांचे आकडे आहेत

प्रत्येक वर्गाची मते जाणून घेतली आहेत.

शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.