AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok Sabha Elections 2024 : ‘राहुल गांधी यांना त्या ठिकाणी हरवू शकत नाही, ते नक्कीच जिंकतील’, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे तरी काय

Himanta Biswa Sarma On Rahul Gandhi: पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी राहुल गांधी यांचे कौडकौतुक केले. लागलीच त्याचे पडसाद भारतात दिसून आले. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भारतात पंतप्रधान तर नरेंद्र मोदी हेच राहतील.

Lok Sabha Elections 2024 : 'राहुल गांधी यांना त्या ठिकाणी हरवू शकत नाही, ते नक्कीच जिंकतील', आसामच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे तरी काय
तिथे राहुल गांधी जिंकतील
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 9:32 AM

भारतातील Lok Sabha Elections 2024 मध्ये आता पाकिस्तानची एंट्री झाली आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्यावर स्तुती सुमनं उधळली. त्याचे लागलीच पडसाद भारतात दिसून आले. भारतीय जनता पक्षाने यावरुन काँग्रेसवर तिखट हल्ला केला. हीच कडी पकडून आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी हे पाकिस्तानमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. ते पाकिस्तानमधून सहज निवडणूक जिंकू शकतात, पण भारतातून नाही, असा चिमटा सरमा यांनी काढला.

तिथे ते निवडून येतील

“पाकिस्तानमध्ये राहुल गांधी सर्वाधिक लोकप्रिय आहेत. पाकिस्तानमध्ये जर निवडणुका झाल्या. तिथे राहुल गांधी उमेदवार म्हणून उभे राहिले. तर ते बहुमताने तिथून निवडून येतील. पाकिस्तानमध्ये राहुल गांधीविरोधात आम्ही जिंकू शकत नाही. पाकिस्तानमध्ये राहुल गांधी यांचा नक्की विजय होईल. राहुल भारतात तर निवडणूक जिंकू शकत नाही, पण ते पाकिस्तानमध्ये नक्कीच निवडून येऊ शकतात. भारतात तर केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असतील.”, असे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मोदींनी पण केला होता हल्ला

या गुरुवारी 2 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण राहुल गांधींवर नाव न घेता हल्लाबोल केला होता. आणंदमधील सभेत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला होता. “आज काँग्रेस कमजोर होत असताना, ती मरणासन्न होत असताना पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेससाठी आता पाकिस्तानचे नेते प्रार्थना करत आहेत. शहजादेला पंतप्रधान करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ झाला आहे.” अशी जहरी टीका मोदींनी केली होती.

चौधरी फवाद हुसैन काय म्हणाले?

पाकिस्तानचे पूर्वमंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राहुल गांधी यांचे कौतुक केले. त्यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ पण शेअर केला. त्यात कॅप्शन लिहिले होते, “राहुल गांधी ऑन फायर.” या व्हिडिओमध्ये ते राम मंदिराच्या विषयात बोलताना, प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात गरीबांना आमंत्रित करण्यात आले होते का? असा सवाल विचारताना दिसत आहेत. हुसैन यांनी हा व्हिडिओ शेअर करत राहुल यांचे कौतुक केले होते.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.