आठ वर्ष पत्नीशी वाद…आता प्रसिद्ध कलाकार भाजपकडून निवडणूक मैदानात
Popular Actor Anubhav Mohanty Controversial Married Life: अनुभव मोहंती याचे लग्न 2014 मध्ये ओडिया आणि बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा प्रियदर्शनीसोबत झाले होते. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांचे प्रकरण न्यायालयात पोहचले. आता मोहंती भाजकडून निवडणूक लढवत आहे.
लोकसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्ष उमेदवारी जाहीर करत आहेत. त्यात काही प्रस्थापितांना धक्का दिला जात आहे. कलाकारांना हा धक्का बसत आहे. भाजपने अभिनेता सनी देओल याचे तिकीट कापले आहे. आता दुसरा प्रसिद्ध अभिनेता भाजपकडून निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. ओडिसा आणि बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध चेहरा अनुभव मोहंती निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. अनुभव मोहंती त्याच्या पत्नीशी संबंधामुळे चर्चेत आला होता. त्याच्या पत्नीने आठ वर्ष त्याला स्पर्शही करुन दिला नव्हता. अनुभव मोहंती याने स्वत: हे सांगितले होते.
लग्नाच्या दोन वर्षात प्रकरण कोर्टात
अनुभव मोहंती याचे लग्न 2014 मध्ये ओडिया आणि बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा प्रियदर्शनीसोबत झाले होते. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांचे प्रकरण न्यायालयात पोहचले. 2016 मध्ये अनुभव मोहंती याने वर्षा प्रियदर्शनीवर आरोप लावले. त्याने म्हटले की, लग्न होऊन दोन वर्ष झाली तरी तिने शारीरिक संबंध निर्माण करु दिले नाही. यासंदर्भात अनेक वेळा विविध पद्धतीने तिची समजून काढली. परंतु आमचे वैवाहिक जीवन सामान्य होऊ शकले नाही.
प्रियदर्शनीने केले आरोप
पतीच्या आरोपानंतर प्रियदर्शनीने पलटवार केला होता. तिने अनुभव याच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले होते. तो दारुड्या आहे, त्याचे अनेकांशी अफेयर्स आहे, असे आरोप प्रियदर्शनीने केले होते. तिने पतीवर घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप केला होता. यामुळे त्यांचे प्रकरण 2020 मध्ये दिल्लीतील न्यायालयात घटस्फोटासाठी पोहचले. या दोघांचे खासगी जीवन सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते. सोशल मीडियावर मोहंती याने पत्नीकडून प्रेम मिळत नसल्याचे म्हटले होते.
अनुभव मोहंती याने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात म्हटले होते की, लग्नाच्या 8 वर्षानंतरही तो त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवू शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलेशनशिपमध्ये जवळीक नसल्यामुळे त्याला मानसिक तणाव जाणवू लागला. अखेर 2023 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.