Loksabha Election 2024 : भाजपकडून तीन माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेचं तिकीट

Loksabha Election 2024: लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. भाजपने मोठ्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ज्यामध्ये तीन माजी मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. कोण आहेत ते तीन नेते जाणून घ्या.

Loksabha Election 2024 : भाजपकडून तीन माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेचं तिकीट
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 8:33 PM

BJP Candidate 2nd List : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आता दुसरी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये 10 राज्यांतील 72 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत १९५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीत ७२ जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले. ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक नावे समोर आली आहेत. या यादीत अनेक बड्या नेत्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल आणि अनुराग सिंह ठाकूर, माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, त्रिवेंद्र सिंह रावत आणि बसवराज बोम्मई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तीन माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी

माजी मुख्यमंत्री त्रिवेंद सिंह रावत यांना हरिद्वार लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने तीन माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी दिली आहे. ज्यामध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना कर्नालमधून, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना हरिद्वारमधून आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना हावेरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांना उत्तराखंडमधील गढवालमधून उमेदवारी देण्यात आलीये. म्हैसूरच्या जागेवर प्रताप सिम्हा यांच्या जागी भाजपने माजी म्हैसूर राजघराण्यातील यदुवीर कृष्णदत्त वाडियार यांना उमेदवारी दिली आहे.

तेजस्वी सूर्या यांना पुन्हा तिकीट

भाजप युवा मोर्चाचे प्रमुख तेजस्वी सूर्या यांनी बंगळुरू दक्षिणमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचलमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना हमीरपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर सुरेश कुमार कश्यप यांना शिमल्यातून तिकीट मिळाले आहे. दोन्ही जागांवर भाजपने पुन्हा जुन्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

महाराष्ट्रातील 20 जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे उत्तर मुंबईतून तर नितीन गडकरी यांना पुन्हा नागपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे.

‘अब की बार ४०० पार’

भाजपने यंदा ३७० जागांचं लक्ष्य ठेवले आहे. तर एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळण्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. अब की बार ४०० पारचा नारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपने ४०० जागांचं लक्ष्य ठेवत अनेक मोठ्या चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.