दिल्लीत मध्यरात्रीपर्यंत खल, महायुतीचे जागा वाटप करुन पवार, शिंदे परतले, कोणाला किती मिळाल्या जागा

loksabha election 2024: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचा जागा वाटपाचा तिढा अमित शाह यांच्या महाराष्ट्रा दौऱ्यात कायम होता. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरले.

दिल्लीत मध्यरात्रीपर्यंत खल, महायुतीचे जागा वाटप करुन पवार, शिंदे परतले, कोणाला किती मिळाल्या जागा
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 7:45 AM

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली | दि. 9 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा आता लवकरच होणार आहे. यामुळे युती आणि आघाड्यांकडून जागा वाटपावर चर्चा केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आणि उमेदवारांची यादी जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर काँग्रेसने यादी जाहीर केली. भाजपची दुसरी यादी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपावरुन रखडली होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचा जागा वाटपाचा तिढा अमित शाह यांच्या महाराष्ट्रा दौऱ्यात कायम होता. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरले. त्यानंतर रात्री दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकाच विमानातून मुंबईकडे आले.

दिल्लीत असे ठरले सूत्र

शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाजप नेते अमित शाह यांच्यासोबत शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत राज्याच्या महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यात यश आले. दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर खलबते झाले.

त्यानंतर भाजपच्या जागावाटपाच्या सूत्रावर तडजोड झाली. यामुळे भाजपच्या पुढील यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश केला जाऊ शकतो. बैठकीत अजित पवार यांना चार जागा देण्याचे निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दहा जागा देण्यात येणार आहे. उर्वरित जागेवर भाजप निवडणूक लढवणार आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे-पवार एकाच विमानातून परतले, फडणवीसांची पुन्हा बैठक

महायुतीच्या नेत्यांची दोन तास बैठक चालली. त्यात जागा वाटप निश्चित झाले. दिल्लीत जागा वाटप निश्चित झाल्यानंतर रात्री २ च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकाच विमानातून मुंबईकडे रवाना झाले. जागा वाटपाचे सूत्र ठरल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.  प्रत्येक मतदारसंघात ज्या पक्षाचा उमेदवार जिंकून येऊ शकतो त्यालाच उमेदवार दिला जाईल, असा फॉर्म्युला या बैठकीत ठरला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.