…आणि राहुल गांधींना सभापतींनी प्रतिष्ठेची आठवण करुन दिली !

लोकसभेत राहुल गांधींच्या कृतीवर सभापती ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली (Loksabha Sabhapati Om Birla on Rahul Gandhi)

...आणि राहुल गांधींना सभापतींनी प्रतिष्ठेची आठवण करुन दिली !
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 6:41 PM

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडताना आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. यावेळी लोकसभेत प्रचंड गदारोळ सुरु होता. राहुल गांधी बजेटवर बोलण्याऐवजी शेतकरी आंदोलनावरुन लोकसभेत आक्रमक झाले. “मी बजेटवर बोलणार नाही, केवळ शेतकऱ्यांवरच बोलणार. जे 200 शेतकरी शहीद झाले त्यांना तुम्ही श्रद्धांजलीही दिली नाही. माझ्या भाषणानंतर 2 मिनिटे श्रद्धांजलीसाठी उभा राहीन, तुम्हीही साथ द्या”, असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभेत शेतकऱ्यांसाठी दोन मिनिट मौन पाळलं. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या इतर खासदारांनीही संसदेत मौन पाळलं (Loksabha Sabhapati Om Birla on Rahul Gandhi).

राहुल गांधींच्या या कृतीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली. राहुल गांधींच्या भाषणावेळी लोकसभेत सुरु असलेल्या गदारोळावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे सभागृहाच्या प्रतिष्ठेला शोभणारं नाही, असं लोकसभेचे सभापती म्हणाले. याशिवाय “सभागृहात कुणाबद्दलही श्रद्धांजली अर्पण करायची असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव लिखित स्वरुपात तुम्ही मला पाठवावा. मी सभागृहातील इतर सदस्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेऊ”, असं सभापतींनी राहुल गांधी यांना सांगितलं (Loksabha Sabhapati Om Birla on Rahul Gandhi).

सभापती नेमकं काय म्हणाले?

“सर्वांनी खाली बसा. माननीय सदस्य, या सभागृहाला चालवण्याची जबाबदारी तुम्ही मला दिली आहे. तुमच्यापैकी कुणी एकजण उत्तराखंडमध्ये घडलेल्या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिट मौन पाळणार असं म्हणतं. कुणी सांगणार, मी बॉर्डरवर शहीद झालेल्या जवानाला श्रद्धांजली अर्पण करणार. याबाबतची जबाबदारी तुम्ही मला दिली आहे. तुम्ही मला बोलू देत नाही. तुम्ही सर्वांनी मला अध्यक्षपदाची जबाबादारी दिली आहे”, असं सभापती म्हणाले.

यापुढे सभापती म्हणाले, “सभागृहात अशाप्रकारे वागणं योग्य नाही. याशिवाय ते नियमातही नाही. सैनिकांप्रती संपूर्ण सभागृहाचा, 130 कोटी जनतेचा सन्मान आहे. सभागृहाच्या प्रतिष्ठेची आणि चालवण्याची जबाबदारी मला देण्यात आली आहे. याबाबतचा तुमचा कुठलाही विषय असेल तर लिहून द्या. मी आपल्या विषयावर सभागृहातील सदस्यांसोबत चर्चा करुन याबाबत निर्णय घेईन. पण सभागृह चालवण्याची जबाबदारी तुम्ही ज्याला दिली आहे, त्याला जबाबदारी पार पाडू द्या.”

संबंधित बातम्या :

लिहून घ्या, शेतकरी मागे हटणार नाही, तुम्हाला हटावं लागेल, कायदे मागे घ्यावेच लागतील

हे सरकार म्हणजे ‘हम दो, हमारे दो’, लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.