अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी मोदी सरकारची परीक्षा, विरोधकांची खेळी

अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी मोदी सरकारची परीक्षा आहे. कारण लोकसभा अध्यक्षांसाठी इंडिया आघाडीनंही उमेदवार दिल्यानं निवडणूक होणार आहे. त्यामुळं पुन्हा संख्याबळ चर्चेत आलंय.पा

अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी मोदी सरकारची परीक्षा, विरोधकांची खेळी
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 9:37 PM

मजबूत विरोधकांच्या रुपात असलेल्या इंडिया आघाडीमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींची अधिवेशनाच्या अवघ्या तिसऱ्याच दिवशी परीक्षा असणार आहे. कारण लोकसभा अध्यक्षपदावरुन विरोधकांसोबत एक मत न झाल्यानं इंडिया आघाडीनंही उमेदवार दिला. त्यामुळं भाजपकडून पुन्हा एकदा ओम बिर्ला विरुद्ध इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे के सुरेश यांच्यात लढत आहे. आता लोकसभा स्पीकर म्हणजेच अध्यक्षपदासाठी निवडणुकीची वेळ का आली.

भाजपनं काँग्रेसला अध्यक्षपदासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. काँग्रेसनं भाजपला सहकार्य करण्यास होकार दिला पण उपाध्यक्षपदाची मागणी केली. 2019 पर्यंत लोकसभेचं उपाध्यक्षपद अनेकदा विरोधकांना देण्याची परंपरा होती. मात्र 2019 मध्ये मोदींना विरोधकांना उपाध्यक्षपद देण्यास नकार दिला. आता 2024 मध्ये इंडिया आघाडीचं संख्याबळ मजबूत असल्यानं विरोधकही आक्रमक आहेत.

भाजपचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं म्हणणं आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना 3 वेळा फोन केला. तर राहुल गांधींनी म्हटलंय की, उपाध्यक्षपदावरुन तुम्हाला फोन करुन सांगतो. पण त्यानंतर त्यांचा फोनच आला नाही. आता सकाळी 11 वाजता लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार हे निश्चित झालं. आता संख्याबळ पाहिलं तर, बहुमत मोदी आणि NDAकडे आहे.

भाजप 240 खासदार आहेत. चंद्राबाबूंच्या टीडीपीचे 16 खासदार . नितीश कुमारांच्या जेडीयूचे 12 खासदार, शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार, एलजेपीचे 5 खासदार आहेत आणि इतर छोटे पक्ष 13 खासदार. त्यामुळे NDAचं संख्याबळ 293 खासदारांचं आहे.

इंडिया आघाडीचं संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसचे 99 आणि सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनीही काँग्रेसला पाठींबा दिलाय म्हणजेच काँग्रेसचे 100 खासदार. अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीचे 37 खासदार, ममतांच्या तृणमूल काँग्रेसचे 29, एम.के. स्टॅलिन यांच्या डीएमकेचे 22 खासदार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार, आरजेडीचे 4 खासदार आणि इतर छोटे पक्षांचे 26 खासदार, अशी एकूण बेरीज होते 235 खासदार.

आता जे NDA किंवा INDIAचा भाग नाहीत, त्यात जगन मोहन रेड्डींच्या YSR काँग्रेसचे 4 खासदार, शिरोमणी अकाली दलाचा 1 खासदार, MIMचे असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत, झेडपीएम 1 खासदार, आझाद समाज पार्टीचा 1 खासदार आणि व्हाईस ऑफ पिपल्स पार्टीचे 1 खासदार. एकूण संख्याबळ होते 9 आणि अपक्ष 6 असे एकूण इतर विरोधक आहेत 15.

आता समजा जे INDIA आघाडीत नाही पण विरोधकांच्या बाकांवर आहेत. त्या 15 खासदारांनी जर इंडिया आघाडीला साथ दिली तर INDIA आघाडीचं संख्याबळ होते 250 खासदारांचं. असं झाल्यास विरोधकांचा आकडा अडीचशेचा आहे हे दिसून येईल. NDAकडे बहुमत आहेच. पण समजा उलटफेर झालाच. तर मग मोदींना मोठा झटका असेल.

अर्थात वेगळी भूमिका घेणारे टीडीपी आणि जेडीयूच असेल. त्यांनी अचानक यूटर्न घेतलाच तर मग सरकारनं बहुमत गमावलं असा त्याचा अर्थ होईल. पण तूर्तास तसं दिसत नाही. भाजपनं काँग्रेसला लोकसभेचं उपाध्यक्षपद दिलं असतं तर अध्यक्षपदासाठी निवडणुकीची वेळच आली नसती. मात्र काँग्रेसच्या अशा अटीची निंदा करतो असं केंद्रीय मंत्री पियूष गोयल म्हणाले आहेत.

भाजपचे खासदार ओम बिर्ला तिसऱ्यांदा खासदार झालेत. गेल्या लोकसभेत तेच लोकसभेच्या अध्यक्षपदी होते. आता पुन्हा भाजपनं त्यांना उमेदवारी दिलीय. तर काँग्रेसचे के सुरेश केरळ काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असून 8 वेळा खासदार आहेत. आणि सध्याच्या लोकसभेत सिनिअर आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.