Liquor Shop | तळीरामांचा बांध फुटला, एकमेकांना चिकटून रांगा, दारुच्या मज्जेसाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
छत्तीसगडमधील राजनांदगाव भागात दारुच्या दुकानाबाहेर मोठ्या संख्येने लोकांनी रांगा लावल्या. (Long Queues outside liquor shop in Chhattisgarh)
छत्तीसगड : कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात मद्यविक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यानंतर वाईन शॉप्सवर तळीरामांच्या अक्षरशः उड्या पडताना दिसत आहेत. छत्तीसगडमध्ये सर्व नियम पायदळी तुडवून मद्यप्रेमींनी रांगा लावल्या. त्यामुळे ‘कोरोना’ आटोक्यात आणण्यासाठी केले जाणारे प्रयत्न वाया जाण्याची भीती आहे. (Long Queues outside liquor shop in Chhattisgarh)
छत्तीसगडमधील राजनांदगाव भागात दारुच्या दुकानाबाहेर मोठ्या संख्येने लोकांनी रांगा लावल्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले. काही जणांनी मास्क लावले होते, मात्र अक्षरशः एकमेकांना चिकटून उभे राहिल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
मद्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखावे लागणार आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात नसतील, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. मात्र इथे सर्रास हे नियम धाब्यावर बसवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात सुरुवातीला केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य विक्रीला सशर्त परवानगी होती, मात्र आता ग्रीन, ऑरेंज आणि रेड या तिन्ही झोनमध्ये, बाजारपेठा आणि मॉलमध्ये नसलेल्या अशा स्वतंत्र मद्यविक्री दुकानांना परवानगी मिळाली आहे.
हेही वाचा : हातात पिशव्या घेऊन अर्धा किमी रांगा, पुण्यात वाईन शॉप्स न उघडल्याने तळीराम हिरमुसले
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून वाईन शॉप सुरु होणार आहेत. वाईन शॉप बंद असतानाच दुकानाबाहेर काही मद्यपी घुटमळत होते. तर वसई, विरार आणि नालासोपारामध्येही वाईन शॉपबाहेर लोकांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या.
Chhattisgarh: Social distancing norms being flouted as people in large numbers queue outside a liquor shop in Rajnandgaon. The state govt has allowed liquor shops to open in the state from today except for the containment zones. #CoronavirusLockdown pic.twitter.com/GfTzQP86Ip
— ANI (@ANI) May 4, 2020
पुण्यात मोठ्या प्रतीक्षेनंतरही मद्य विक्री सुरु न झाल्यामुळे मद्यप्रेमी निराश झाले. वाईन शॉप समोरील गर्दी हटवण्यासाठी पोलीस दुकानासमोर दाखल झाले.
ठाण्यात वाईन शॉप सुरु होणार नसल्याचे सांगत पोलीस रांग लावल्यास कारवाई करण्याचा इशारा देत आहेत. तर नवी मुंबईतही वाईन शॉप सुरु होणार नाहीत, अशी माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली. सोलापूर शहरातही स्थानिक प्रशासनाने दारु विक्रीस परवानगी दिलेली नाही.
औरंगाबादेत दारूची दुकाने उघडण्याला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचा विरोध आहे. औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडल्यास महिलांसह रस्त्यावर उतरु, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला. अमरावती-अकोल्यातही दारुची दुकानं बंद राहणार आहेत. (Long Queues outside liquor shop in Chhattisgarh)