विमानतळावर रेडियोएक्टिव मटेरियल लीक, दोन कर्मचारी बेशुद्ध, दीड किमीपर्यंत भाग केला रिकामा

लखनऊमधून गुवाहाटी विमान जाणार होते. लखनऊ एअरपोर्टमधील टर्मिनल 3 वर स्कॅनिंग दरम्यान मशीनमधून बीप आवाज आला. कॅन्सरसाठी लागणारी औषध लाकडाच्या बॉक्समध्ये होते. त्या औषधात रेडियोएक्टिव एलिमेंटचा वापर करण्यात आला होता.

विमानतळावर रेडियोएक्टिव मटेरियल लीक, दोन कर्मचारी बेशुद्ध, दीड किमीपर्यंत भाग केला रिकामा
लखनऊ विमानतळावर तपासणी
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 1:49 PM

कॅन्सर रुग्णांसाठी असलेले रिडियोएक्टिव मटेरियल लखनऊ विमानतळावर लीक झाले. त्यानंतर कार्गो एरिया रिकामा करण्यात आला. घटनास्थळावर एनडीआरएफची टीम पोहचली आहे. रिडियोएक्टिव मटेरियल दिसत नाही, परंतु सर्वात जास्त धोकादायक असतो. सुरक्षा एजन्सी हे मटेरियल आले कसे? याची चौकशी करत आहे. या घटनेत दोन कर्मचारी बेशुद्ध झाले आहेत.

शनिवारी एक विमान लखनऊमधून गुवाहाटी जात होते. लखनऊ एअरपोर्टमधील टर्मिनल 3 वर स्कॅनिंग दरम्यान मशीनमधून बीप आवाज आला. कॅन्सरसाठी लागणारी औषध लाकडाच्या बॉक्समध्ये होते. त्या औषधात रेडियोएक्टिव एलिमेंटचा वापर करण्यात आला होता. अलार्म वाजताच सुरक्षा एजन्सीला त्याची माहिती दिली गेली. त्यानंतर त्या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफची टीम बोलवण्यात आली. रेडियोएक्टिव एलिमेंट विमानतळावर पोहचला कसा? याचा तपास केला जात आहे.

असा उघड झाला प्रकार

लखनऊ विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील टर्मिनल 3 वर लखनौ ते गुवाहाटी या फ्लाइटमधील एका बॉक्समध्ये कॅन्सरची औषधे पाठवली जात होती. तपासणी दरम्यान लगेज स्कॅनरमधून बीप आवाज ऐकू आला. त्यामुळे तो बॉक्स उघडला. त्यात कॅन्सरचे औषधे होती. त्या औषधाच्या संरक्षणासाठी वापरलेले किरणोत्सर्गी पदार्थ लीक झाली. यामुले दोन कर्मचारी जागेवरच बेशुद्ध झाले. त्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. यामुळे टर्मिनल 3 पूर्ण रिकामा करण्यात आला. विमानतळाचा ताबा सीआयएसएफ आणि एनडीआरएफकडे सोपवण्यात आला आहे.

एनडीआरएफने विमानतळ परिसरातील 1.5 किलोमीटर एरिया रिकामा केला आहे. सुरक्षा एजन्सी सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे. घाबरण्यासारखी परिस्थिती नाही, असे विमानतळावरील सूत्रांनी सांगितले.

काय असतो रेडियोएक्टिव

रेडियोएक्टिव पदार्थात अल्फा, बीटा, गामा किरण असतात. ते अतिशय सक्रिय पदार्थ आहे. ते घातक पदार्थ सोडतात. याचा संपर्कात आल्यानंतर व्यक्तीला गंभीर आजार होऊ शकतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.