AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lumpy Virus: लंपी व्हायरसचा तांडव थांबता थांबे ना! मृत गायींचा आकडा थक्क करणारा

केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले की, रोगाचा सामना करण्यासाठी सर्व राज्यांशी समन्वय वाढवण्यासाठी दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याद्वारे राज्याच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत आहेत.

Lumpy Virus: लंपी व्हायरसचा तांडव थांबता थांबे ना! मृत गायींचा आकडा थक्क करणारा
लंपी वायरसImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 10:59 AM

नवी दिल्ली,  लंपी व्हायरसने (Lumpy Virus) देशभरात 58 हजारांहून अधिक गायींचा बळी घेतला आहे. राजधानी दिल्लीतही या विषाणूच्या संसर्गाची 173 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. आतापर्यंत 12 राज्यांमध्ये हा आजार पसरल्याची माहिती होती मात्र केंद्रीय  पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Purushottam Rupal) यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आता हा आजार 16 राज्यांमध्ये दार ठोठावत आहे. राजस्थान हे लंपी व्हायरसचे सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. या ठिकाणी जनावरांचे शव पुरण्यासाठी जागा कमी पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आहे.

दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू

केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले की, रोगाचा सामना करण्यासाठी सर्व राज्यांशी समन्वय वाढवण्यासाठी दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याद्वारे राज्याच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत आहेत. याबाबत सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. याशिवाय लसीचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नांबाबत त्याच्या उत्पादकांशी चर्चा झाली असल्याचेही मंत्री रूपात म्हणाले. राजस्थानची स्थिती जाणून घेण्यासाठी आपणही तेथे गेलो असून राज्य सरकारला पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे देखील ते यांनी सांगितले.

काही राज्यांमध्ये दूध संकट

गुजरातमधून सर्वाधिक दुधाचे संकलन होते, अशी माहिती केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिली. तेथे लम्पी विषाणू जवळजवळ शांत स्थितीत आला आहे. ते म्हणाले की आपण अमूलशी बोललो, तेथून त्यांच्या दूध संकलनावर कोणतेही संकट नसल्याचे उत्तर आले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे लंपी व्हायरस?

लंपी विषाणू हा गुरांचा संसर्गजन्य रोग आहे. त्याला कॅप्री पॉक्स व्हायरस असेही म्हणतात. डास, माश्या, उवा इत्यादी या रोगाचे वाहक म्हणून काम करतात. दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनानेही लंपी विषाणूचा संसर्ग पसरतो, असेही सांगितले जात आहे. या विषाणूची लागण झालेल्या प्राण्यांच्या त्वचेवर गुठळ्या तयार होतात, त्यानंतर त्यांना फोड येतात. गुरांना ताप येणे, नाक वाहणे, जास्त लाळ गळणे आणि डोळे लाल होणे अशी लक्षणे आहेत. हा आजार जीवघेणा ठरत आहे. या आजारावर कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही परंतु त्याचे निदान म्हणून गोटपॉक्स लस वापरली जात आहे. लसीचा डोस संसर्गाशी लढण्यासाठी प्राण्यांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित करतो. याशिवाय संक्रमित गुरे वेगळी ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....