BJP | भाजपाची मोठी खेळी, शिवराज सिंह चौहान यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात?
BJP | भाजपाला मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी ते पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्रीपदाची शर्यतही त्यांनी इंटरेस्टिंग बनवलीय. भाजपाची ही मोठी राजकीय खेळी आहे.
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने सोमवारी रात्री उशिरा आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपाने 39 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात खासदारांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यापासून प्रह्लाद पटेल, भग्गन सिंह कुलस्ते आणि राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना मैदानात उतरवलय. भाजपाला मध्य प्रदेशच मैदान मारायचय. त्याचवेळी मुख्यमंत्रीपदाची शर्यत देखील इंटरेस्टिंग बनवलीय. केंद्रीय मंत्री, खासदार आणि दिग्गज नेते निवडणूक मैदानात उतरल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं टेन्शन वाढलय. कारण भाजपाने अजूनपर्यंत कुठल्याही नेत्याच नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषित केलेलं नाहीय. भाजपाने सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. निकालानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होईल. त्यामुळे मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा पर्याय खुला आहे. निवडणूक जिंकल्यास भाजपाच्या कुठल्याही नेत्याला मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागू शकते.
भाजपाने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना मुरैनाच्या दिमनी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरवलय. दिमनी विधानसभेच्या जागेवर तोमर यांच्या पसंतीचा उमेदवार निवडणूक लढवायचा. यावेळी ते स्वत: विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. तोमर 20 वर्षानंतर विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. 2003 मध्ये ते ग्वालियरमधून शेवटची विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर 2009 साली खासदार बनून केंद्रीय राजकारणात सक्रीय झाले. आता ते पुन्हा एकदा विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत. आता 33 वर्षानंतर लढणार विधानसभा निवडणूक
केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल मागच्या साडेतीन दशकापासून राजकारणात आहेत. पहिल्यांदाच ते विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. भाजपाने त्यांना नरसिंहपूर विधासनभा मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. तिथून जालम पटेल आमदार होते. केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांना निवास सीटवरुन उमेदवारी दिलीय. 1990 साली कुलस्ते शेवटची विधानसभेची निवडणूक जिंकले होते. आता 33 वर्षानंतर ते पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. भग्गन सिंह कुलस्ते भाजपाचा आदिवासी चेहरा आहे. प्रह्लाद पटेल ओबीसी समुदायातून येतात.