सक्तीच्या निवृत्तीविरोधात आंदोलन, मेधा पाटकर यांच्यासह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या कामगारांना अटक
आदित्य बिर्ला ग्रुपने कामगारांवर लादलेल्या सक्तीच्या स्वेच्छा निवृत्तीविरोधात आंदोलन करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मध्य प्रदेशमध्ये अटक करण्यात आलीय.
भोपाळ : आदित्य बिर्ला ग्रुपने कामगारांवर लादलेल्या सक्तीच्या स्वेच्छा निवृत्तीविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात हजारो कामगार आंदोलन करत आहेत. मध्य प्रदेशातील खरगोन येथे हे आंदोलन सुरू आहे. मात्र, पोलिसांनी आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने सुरू असतानाच कारवाई केली. यावेळी पोलिसांनी मेधा पाटकर यांच्यासह अनेक कामगारांना अटक केली. सेंचुरी कामगारांसह मेधा पाटकर यांना अटक केल्यानं देशभरातून या कारवाईचा निषेध होत आहे.
विशेष म्हणजे या कंपनीत जवळपास 40 टक्के मराठी कामगार आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील धुळे शिरपूरमधील अनेक नागरिक या कंपनीत काम करतात. मात्र, सक्तीच्या निवृत्ती धोरणामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय. हे सर्व कामगार आदित्य बिर्ला यांच्या सेंचुरी यार्न आणि डेनिम कंपनीत काम करतात. या कामगारांनी कंपनी मालक आणि तथाकथित युनियन पुढारी अन्याय करत असल्याचा आरोप करत 2017 मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात केली. श्रमिक जनता संघाच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झालं.
VIDEO: आदित्य बिर्ला ग्रुपच्या सक्तीच्या निवृत्ती धोरणा विरोधात आंदोलन करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक, हजारो कर्मचाऱ्यांचं मध्य प्रदेशमधील खारगोने जिल्ह्यात आंदोलन सुरू, आंदोलनाच्या दडपणुकीचा देशभरातून निषेध@medhanarmada @napmindia #MedhaPatkar pic.twitter.com/u8shzasaZr
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 3, 2021
“पोलीस कारवाईत अनेक महिला जखमी, त्यानंतरही अटक”
MP police brazen attack and arrest of peaceful andolankaris of century denim mill workers is condemnable. Many injured and @medhanarmada and others arrested. @AdityaBirlaGrp forcibly closing mill and asking workers to accept VRS. pic.twitter.com/xTXZ7SVnt0
— Madhuresh Kumar (@kmadhuresh) August 3, 2021
आंदोलक कामगार आज (3 ऑगस्ट) 1388 व्या दिवशी रोजगार द्या यामागणीसाठी सत्याग्रह करत आहेत. शांततापूर्ण आंदोलन सुरू असतानाच अचानक सकाळी 11 वाजता 3 जिल्ह्यांमधील पोलिसांनी एकत्रित येऊन श्रमिकांचे धरना स्थळ घेरत अटकसत्र सुरू केलं. या कारवाईत अनेक महिला जखमी झाल्या. अशा अवस्थेत देखील त्यांना अटक करण्यात आली, असा आरोप कामगारांनी केलाय. शासनाकडून कायदेशीर परवानगी न घेताच कंपनी बंद केल्यामुळे कामगार रोजगार मिळण्यासाठी सत्याग्रह करत असल्याची माहिती श्रमिक जनता संघाने दिलीय.
Ongoing police repression at dharna sthal of Century workers in Madhya Pradesh. Workers Union leaders of Century Yarn (Denim) at Magarkhedi, Kasravad, Dist. Khargone, picked up & arrested along with @medhanarmada @CMMadhyaPradesh exposes his anti-working class approach again. pic.twitter.com/DZ17JR7Dce
— Meera Sanghamitra (@meeracomposes) August 3, 2021
“कबूल केल्याप्रमाणे 1 रूपयात कंपनी कामगारांकडे चालवायला द्या”
दरम्यान कंपनीने 29 जून 2021 रोजी VRS ची नोटीस लावून 15 दिवसात अर्ज मागविण्यात आले होते. परंतु कामगारांनी स्वेच्छा निवृत्तीला नकार देत रोजगारासाठी आग्रह धरला. कंपनी चालवता येत नाही तर कबूल केल्यानुसार श्रमिकांना नाममात्र 1 रूपयात कंपनी सहकारी तत्वावर चालवण्यासाठी द्या, अशी मागणी कामगारांनी केलीय. याबाबत मध्य प्रदेश उच्च न्यायालयातही लढा दिला जात आहे, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिली.
“मेधा पाटकर आणि सर्व श्रमिकांची ताबडतोब सुटका करा”
मध्य प्रदेश सरकारने या विषयी मध्यस्थी करून श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न न करता कंपनी मालकालाच पाठीशी घातल्याचा आरोप कामगारांनी केलाय. तसेच पोलिसांकरवी कामगारांचं आंदोलन दडपलं आहे, असा गंभीर आरोप केला. देशभरातील अनेक सामाजिक संघटनांनी या पोलीस कारवाईचा निषेध करत मेधा पाटकर आणि सर्व श्रमिकांची ताबडतोब सुटका करावी, अशी मागणी केलीय.
हेही वाचा :
मोदी सरकार अंबानी-अदानीसाठी काम करतंय, पुढच्या निवडणुकीसाठी फंडची तयारी सुरु : मेधा पाटकर
मुंबईत पाईपलाईन्सवर वास्तव्य करणारे लोक म्हणजे दहशतवादी नव्हेत: मेधा पाटकर
मुंबईत 1 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या निवृत्ती विरोधात आंदोलन, मेधा पाटकरांसह अनेकांना अटक
व्हिडीओ पाहा :
Madhya Pradesh Police arrest Medha Patkar after protest against VRS