धक्कादाक, कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर 11 दिवस उपचार, मध्य प्रदेशातील रुग्णालयाचा भोंगळ कारभार

| Updated on: Sep 16, 2021 | 7:12 PM

कोरोना संसर्गानं मृत्यू झालेल्या व्यक्तीला कागदोपत्री बरा झाल्याचं दाखवण्यात आलं होतं ही धक्कादायक बाब उघडकीस आली. तर, नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक विभागांचे उंबरठे झिजवायला लागले.

धक्कादाक, कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर 11 दिवस उपचार, मध्य प्रदेशातील रुग्णालयाचा भोंगळ कारभार
Follow us on

भोपाळ: मध्यप्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर 11 दिवस उपचार सुरु होते. ज्यावेळी कोरोनाच्या काळात एखाद्या रुग्णाला उपचार मिळणं अवघड होतं. त्या काळात ही घटना घडल्यानं आश्चर्यकारक घटना घडलीय. संबंधित व्यक्तीचे नातेवाईक मृत्यू प्रमाणपत्र घ्यायला गेले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना संसर्गानं मृत्यू झालेल्या व्यक्तीला कागदोपत्री बरा झाल्याचं दाखवण्यात आलं होतं ही धक्कादायक बाब उघडकीस आली. तर, नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक विभागांचे उंबरठे झिजवायला लागले.

नेमकं प्रकरण काय

मिळालेल्या माहितीनुसार टिकमगढ जिल्ह्यातील एकता कॉलनीतील रहिवासी रामनारायण श्रोती यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. 6 दिवस उपचार केल्यानंतर त्यांची पकृती सुधारत नव्हती. त्यामुळे 18 एप्रिलला त्यांना डॉक्टरांशी चर्चा करुन घरी नेण्यात आलं आणि 19 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यासाठी रुग्णालयाकडं डिस्चार्ज कार्ड मागण्यासाठी अनिरुद्ध श्रोती यांनी संपर्क केला असता तुम्ही रुग्णाला स्वत: नेल्यानं डिस्चार्ज कार्ड बनवण्यात आलं नाही, असं सांगितलं गेलं. अखेर अनिरुद्ध श्रोती यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली.

रुग्णालयानं काय माहिती दिली?

अनिरुद्ध श्रोती यांना रुग्णालयानं माहितीच्या अधिकारात रामनारायण श्रोती यांच्या कोरोना रिपोर्टसह उपचाराची माहिती दिली आहे. रामनारायण श्रोती यांना 30 एप्रिलला बरं झाल्यानंतर डिस्चार्ज करण्यात आल्याचं रुग्णालयानं कळवलं आहे. मात्र, त्यांचा मृत्यू 19 एप्रिलला झाला होता. रुग्णालयानं श्रोती यांच्या मृत्यूनंतर 11 दिवस उपचार केले. त्यांना विविध इंजेक्शन आणि औषधं दिली गेली असल्याचं म्हटलं आहे. टिकमगढच्या रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुढं आल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.कोरोनातून बरं झाल्याचा उल्लेख डिस्चार्ड कार्डवर असल्यानं अनेक अडचणी येत असल्याचं अनिरुद्ध श्रोती म्हणाले आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती समोर आल्यानंतर रुग्णालयाची बाजू अद्याप समोर आलेली नाही. रुग्णालय प्रशासन काय म्हणतेय ते देखील पाहावं लागणार आहे.

देशात नवे कोरोना रुग्ण वाढले

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होतं, मात्र अचानक पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 3 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात देशात 30 हजार 570 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 431 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

इतर बातम्या

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ सुरुच, कोरोनाबळींचा आकडाही वाढला

Madhya Pradesh Tikamgadh hospital showing treatment for 11 days after the death of corona patient on discharge card