Video: सोमनाथाचे लुटलेले दरवाजे जेव्हा महादजी शिंदेंनी परत आणले, ज्योतिरादित्य शिंदेकडून ऐका अंगावर काटा आणणारा प्रसंग
महम्मद गजीनीने ज्यावेळी सोमनाथ मंदिराची लूट केली त्यावेळी त्याने मंदिराचे दरवाजेही तोडून तो लाहोरला घेऊन गेला होता. त्या रणकंदनात महादजी शिंदे असणे म्हणजे समोरच्याला धडकी भरत असे.
मुंबईः देशाच्या इतिहासाची पानं जेव्हा पुन्हा पुन्हा पालटली जातात तेव्हा तेव्हा त्यातील सोनेरी क्षण अधिक उठावदारपणे दिसत असतात. असाच एक शौर्याचा आणि धाडसाचा इतिहासातील एक प्रसंग ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांनी सांगितला आहे. त्यांनी जो महादजी शिंदे (Mahadji Shinde) यांचा इतिहासातील सोमनाथ मंदिराचा (Somnath Temple) संदर्भ देऊन माहिती देऊन सांगितली आहे. तो प्रसंग इतिहासात महादजी शिंदे यांच्याच नावाने अमर झाला आहे.
महम्मद गजीनीने ज्यावेळी सोमनाथ मंदिराची लूट केली त्यावेळी त्याने मंदिराचे दरवाजेही तोडून तो लाहोरला घेऊन गेला होता. त्या रणकंदनात महादजी शिंदे असणे म्हणजे समोरच्याला धडकी भरत असे. गजनीने ज्यावेळी मंदिर लुटून मंदिरातील बरचसं साहित्य तो लाहोरला घेऊन गेला होता, ते सगळं साहित्य महादजी शिंदे यांनी १७८२ मध्ये पुन्हा भारतात आणले. त्या काळात राजघराण्यातील वादामुळे सगळ्याच बाबतीत त्यांच्यावर विरोधकांचा डोळा हा होताच तरीही महादजी शिंदे यांनी लाहोरातून जाऊन सोमनात मंदिराचा दरवाजा भारतात आणला.
भविष्याचा वेध घेणारा थोर सेनानी
महादजी शिंदे म्हणजे भविष्यातील दिवस डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करणारा थोर सेनानी होता, म्हणूनच आज देशाच्या इतिहासात या शौर्यवादी सेनानीचं नाव सुवर्णक्षरांना कोरून ठेवलं आहे ते त्यांच्या अमूल्य योगदानामुळे. मराठा साम्राज्याचे ते थोर सेनानी असले तरी विरोधकांच्या गोठात जाऊन बुद्धीच्या जोरावर त्यांनी प्रत्येक लढाईला मूठमाती देऊन मराठ्यांच्या इतिहासाची नोंद इतिहासाला घ्यायला लावली आहे.
युद्धातील शस्त्र बनविण्याचा कारखाना
मराठ्यांच्या युद्धसेनानी भविष्याचा वेध घेणारा होता, हे त्यांच्या कारकीर्दीमुळे लक्षात येते. युद्धनीतीचे नवे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले कारण त्यांना माहिती होतं भविष्यात आपला लढा हा इंग्रजांसोबत असणार आहे. महादजी शिंदे यांच्या काळात लढाया ज्या लढल्या गेल्या त्या सगळ्या लढाया या तलवार, ढाली आणि भाले अशा साहित्यांवर लढल्या गेल्या. इंग्रजांच्या युद्धात ही शस्त्र सैनिकांसाठी धोकादायक होती म्हणून त्याकाळात महादजी शिंदे यांनी आग्राजवळ बंदूक आणि तोफखाना अशा यंत्रसाम्रगी बनविण्याचा कारखाना तयार करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी आग्राजवळ औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. या सगळ्या गोष्टीमुळेच नंतर इंग्रजांसोबत लढताना भारतीय सैनिकांमध्ये आधुनिकीकरणाचे वारे वाहू लागले. त्यामुळेच त्यांनी हा युद्धातील शस्त्र बनविण्याचा कारखाना बनविला.
इंग्रजांना भारी पडायचे
भारतीय सैन्य दलाचे आधुनिकीकरण, त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्यात महादजी शिंदे 1771 पासून कार्यरत होते. युद्धनितीतील शास्त्रामुळेच त्यांनी वडगावची, सिरशी, सारंगपूर आणि प्रयागची इंग्रजांविरुद्धची लढाई त्यांनी जिंकली आहे, म्हणून इतिहासात असं म्हटलं आहे की, महादजी शिंदे जोपर्यंत जीवंत होते तो पर्यंत ते इंग्रजांना भारी पडायचे. त्यांनी ज्या ज्यावेळी इंग्राजांबरोबर लढा पुकारला आहे त्या त्यावेळी त्याना इंग्रजांना दुर्बल करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, आणि त्यांना पिटाळून लावण्यात आले आहे.
अव्वल होते ते स्पष्टवक्तेपणामुळे
महादजी शिंदे यांना गौरवताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात, महादजी शिंदे म्हणजे जनक्रांकारक विचारधारेचे ते पाईक होते. हे करत असताना त्यांना धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न तर केले पण त्यांना संरक्षणही दिले. मथुरेत असणारी मंदिरे आणि गो शाळेची केलेली स्थापना ही महादजी शिंदे यांचीच देण आहे. त्यांनी फक्त लढाई लढून इतिहासात अजरामर झाले नाहीत तर जालन्याजवेळ आनंद स्वामींच्या मंदिराचा जिर्णोध्दरही केला आहे. ते लढाईत अव्वल होते तसेच ते स्पष्टवक्तेपणामुळे ही त्या काळात ते प्रसिद्ध होते. अशा या महायोद्धाला इंग्रजांकडूनही द ग्रेट मराठा म्हणून मानाने गौरव केला आहे.
संबंधित बातम्या
राणेंचा लोकसभेत गडबड घोटाळा; केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर, सभापतींनी कसे निस्तारले?