Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राजकीय पक्षांची मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य, मतदारांना आता असे करता येणार नाही…
Maharashtra Assembly Election Voting Date 2024: राजकीय पक्षांनी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी लागून मतदान घेऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. सुटी लागून मिळाल्यावर मतदार फिरण्यासाठी किंवा इतर कामांसाठी बाहेर गावी जातात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी परिणाम होतो.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला. 20 नोव्हेंबर म्हणजे बुधवारी मतदान होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राजकीय पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केल्याचे यावरुन दिसून येते. राजकीय पक्षांनी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी लागून मतदान घेऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. सुटी लागून मिळाल्यावर मतदार फिरण्यासाठी किंवा इतर कामांसाठी बाहेर गावी जातात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी परिणाम होतो. राजकीय पक्षांची ही मागणी लक्षात घेऊन बुधावारी मतदान निवडणूक आयोगाने ठेवले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नुकताच दौरा केला होता. संपूर्ण व्यवस्था समजून घेऊन सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. महाराष्ट्रात ९ कोटी ६३ लाख मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुरुष मतदार ४ कोटी ९३ लाख तर महिला मतदार ४ कोटी ६० लाख आहेत. तसेच २० लाख ९३ हजार मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. १२ लाख ५ हजार ज्येष्ठ मतदार आहेत. दिव्यांग ६ लाख २ हजार मतदार आहेत.
ही सुविधा मिळणार
८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांसाठी घरुन मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. त्या लोकांकडून फार्म १२ भरुन दिला जाणार आहे. हा फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतले जाईल. सर्व गोष्टींची व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे.
2019 मध्ये असा होता निवडणूक कार्यक्रम
२०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी जाहीर झाली होती. तसेच २१ ऑक्टोंबरला मतदान झाले होते. मतमोजणी आणि निकाल २४ ऑक्टोबर २०१९ रोजी लागले होते. राज्यातील सर्व २८८ जागांवर एकाच टप्प्यात मतदान झाले होते. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती होती. भाजपने १६४ तर शिवसेनेने १२४ जागांवर निवडणूक लढवली होती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. काँग्रेसने १४७ तर राष्ट्रवादीने १२१ जागांवर निवडणूक लढवली होती.
कोणाला किती मिळाल्या जागा
- भारतीय जनता पक्ष १०५
- शिवसेना ५६
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५४
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४४