इंदूर : देशात दहशतवादी हल्ले घडवण्याची योजना होती. यासंदर्भात एक संशयित अतिरेक्याला अटक करण्यात आली आहे. या अतिरेक्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएसची टीम इंदूरमध्ये दाखल झाली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (National Investigation Agency) सूचनेनंतर इंदूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गोपनीय अहवालाच्या आधारावर (Confidential Report) त्याला अटक केली आहे. त्या संशयित दहशतवाद्याचे नाव सरफराज मेमन (Sarfaraz Memon) आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांनी याला दुजोरा दिला आहे.
पाकिस्तानात प्रशिक्षणाची संशय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्फराजने चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँगमधून प्रशिक्षण घेतले आहे. तो भारतात मोठ्या हल्ल्याची योजना तयार करत होतो, असे एनआयएच्या अहवालात म्हटले आहे. प्राथमिक चौकशीत सर्फराजने पोलिसांना सांगितले आहे की, तो 12 वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहत आहे. एनआयएने त्याचे नाव कोणत्याही दहशतवादी संघटनेशी अद्याप जोडलेले नाही. या संशयित अतिरेक्याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली आहे. एनआयएने यासंदर्भात महाराष्ट्र एटीएसला अर्लट केले होते.
NIA कडून मुंबई पोलिसांना ईमेल
संशयित सरफराज मेमन, ज्याच्या संदर्भात NIA ने मुंबई पोलिसांना ईमेल केले होते. आता त्याला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इंदूरच्या चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये सध्या तो आहे.
देशात हल्ल्याची योजना
हाँगकाँग, पाकिस्तान-अफगाण सीमा आणि पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर मुंबईत दाखल झालेला सरफराज मेमन देशात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याची योजना आखली होती, असे एनआयएने म्हटले आहे. यामुळे सर्फराज मेमनला अटक झाल्यानंतर मुंबई पोलीस पोहचली आहे. एनआयएने मुंबई पोलिसांना दिलेल्या ईमेलमध्ये सरफराज मेमनचे वर्णन भारतासाठी ‘धोकादायक’ असे के आहे.
आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
सर्फराजचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टही मुंबई पोलिसांना मेल केले. याप्रकरणी एनआयएने मुंबई पोलिसांसोबत संयुक्त तपास सुरू केला होता. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर इंदूर पोलिसांनीही याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि रात्री उशिरा त्याला पकडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्फराज मेमन मोठा हल्ला करण्याच्या इराद्याने देशात फिरत होता.