VIDEO: गुलाबराव म्हणाले, मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे; हेमा मालिनी भडकल्या, म्हणाल्या…

माझ्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत, असं विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं.

VIDEO: गुलाबराव म्हणाले, मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे; हेमा मालिनी भडकल्या, म्हणाल्या...
BJP MP Hema Malini
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 1:32 PM

नवी दिल्ली: माझ्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत, असं विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. गुलाबराव पाटलांच्या या विधानावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता. आता भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही या विधानावर संताप व्यक्त केला आहे. सामान्य लोक बोलतात समजू शकतो. पण संसदीय राजकारणातील लोकांनी असं विधान करू नये, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी व्यक्त केली आहे.

हेमा मालिनी यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी माझे गाल चांगले ठेवत असते म्हणून कदाचित बोलले असतील. हरकत नाही. हा विनोदाचा भाग सोडा. मला वाटतं त्यांना काही वाटलं असेल म्हणून बोलले. काही वर्षांपूर्वी लालूंनी असं विधान केलं होतं. त्यानंतर अनेकांनी तसंच बोलायला सुरुवात केली. पण अशा प्रकारची कमेंट करणं योग्य नाही. सामान्य लोकांनी बोलणं वेगळं. पण संसदीय राजकारणातील व्यक्तीने असं विधान करू नये. कोणत्याही स्त्रीबाबत असं विधान केलं जाऊ नये, असं हेमा मालिनी म्हणाल्या.

पाटील नेमकं काय म्हणाले?

जळगाव येथे बोदवड नगरपंचायतीच्या प्रचार सभेत विरोधकांवर टीका करताना आणि आपल्या कामाची माहिती देताना गुलाबराव पाटील यांनी हे विधान केलं होतं. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल पाटील यांनी केला होता.

राऊतांकडून समर्थन

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाटील यांच्या या विधानाचं समर्थन केलं होतं. या प्रकारची तुलना आधीही झाली आहे. हा तर हेमा मालिनी यांचा सन्मान आहे. या विधानाकडे नकारात्मकरित्या पाहू नका. यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी याचं उदाहरण दिलं होतं. आम्ही सर्व हेमा मालिनींचा आदरच करतो, असं राऊत म्हणाले होते.

पाटलांची माफी

गुलाबराव पाटील यांच्या या विधानाचे राज्यात पडसाद उमटले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यापासून ते भाजप नेत्या चित्रा वाघांपर्यंत सर्वांनी या विधानाचा निषेध नोंदवला होता. तसेच पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही पाटील यांना विधान मागे घेऊन माफी मागण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पाटील यांनी आपल्या विधानावर माफी मागितली होती.

संबंधित बातम्या:

Gulabrao Patil: मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले, विरोधकांनी येऊन पाहावं, गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना डिवचलं

सत्तेसाठी 2014मध्ये शिवसेनेला दूर ठेवण्याचा डाव होता, राऊतांचा गंभीर आरोप; संदर्भ नेमका काय? वाचा सविस्तर

ताईसाहेब राष्ट्रीय सरचिटणीस, पण केजमध्ये कमळच नाही, मंत्री धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.