गेल्या सात वर्षात मोदी सरकारने काश्मिरी पंडितांसाठी काय केले?; सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या ‘त्यांना’ नोकऱ्यांचे आमिष तुम्हीच दाखविलेले

सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांवर बोलताना अर्थसंकल्पाचाही विषय उचलून धरला. त्यांनी यावेळी मोदी सरकारला जम्मू काश्मीरमधील पंडितांचा कळवळा येत आहे तर मग त्यांच्यासाठी मोदी सरकारने स्वतंत्र काय तरतूद केली आहे. त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणते नवीन कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यांची परिस्थिती सांगत असताना गेल्या साठ वर्षाचा निर्वाळा तुम्ही किती दिवस देणार आहात

गेल्या सात वर्षात मोदी सरकारने काश्मिरी पंडितांसाठी काय केले?; सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या 'त्यांना' नोकऱ्यांचे आमिष तुम्हीच दाखविलेले
Supriya SuleImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 10:36 PM

नवी दिल्लीः देशात सध्या द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत चर्चा करुन हा चित्रपट पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले. जम्मू काश्मीरमधून जे काश्मीरी पंडित स्थलांतरित झाले आणि त्यांची नंतर दयनीय अवस्था झाली त्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकारची सत्य बाहेर आली पाहिजे. जे सत्य अनेक वर्षांपासून दडपून ठेवले होते, ते या चित्रपटाच्या माध्यमातून सांगितले गेले आहे. आणि ज्यांना या चित्रपटातील गोष्ट खरी वाटत नाही त्यांनी दुसरा चित्रपट बनवावा असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेत नरेंद्र मोदी यांना सवाल उपस्थित केला की, त्यांचा कळवळा एवढा जाणवत असेल तर गेल्या सात वर्षात विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी मोदी सरकारने काय केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांवर बोलताना अर्थसंकल्पाचाही विषय उचलून धरला. त्यांनी यावेळी मोदी सरकारला जम्मू काश्मीरमधील पंडितांचा कळवळा येत आहे तर मग त्यांच्यासाठी मोदी सरकारने स्वतंत्र काय तरतूद केली आहे. त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणते नवीन कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यांची परिस्थिती सांगत असताना गेल्या साठ वर्षाचा निर्वाळा तुम्ही किती दिवस देणार आहात आणि आता तुम्ही गेल्या सात वर्षात त्यांच्यासाठी काय केले आहे असा सवाल उपस्थित केला.

तुम्ही काय केले पंडितांसाठी

मोदी सरकारला काश्मिरी पंडितांची एवढी काळजी वाटत असेल तर त्यांच्यासाठी तुमच्या अर्थसंकल्पात काय योजना आखल्या. एवढीच काळजीतून तुमचा ऊर भरुन येत असेल तर त्यांच्यासाठी आखा वेगळ्या योजना. भले गेल्या साठ वर्षात त्यांच्यासाठी काही केले नाही असं धरुन चालू पण तुम्ही त्यांच्यासाठी या सात वर्षात काय केले हेही सांगा

काश्मिरी नागरिकांना नोकऱ्या देणार होता त्याचे काय झाले

सध्या सत्तेत असलेल्या केंद्र सरकारने काश्मिरी नागरिकांसाठी हजारो नोकऱ्या देण्याचे अश्वासन दिल्याचा आरोप करत त्यांच्यासाठी आतापर्यंत काहीच केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्यासाठी प्रत्यक्षात काय झाले हे जाणून घेण्याची खरी गरज आहे असे मतही सुप्रिया सुळे यांनी मांडले.

संबंधित बातम्या

Congress : पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर, सोनिया गांधींचे 5 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश

Supreme Court : भाडे न भरणे हा गुन्हा नाही; सुप्रीम कोर्टाचा भाडेकरुंना मोठा दिलासा

Hijab Controversy : हिजाब प्रकरणातील कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयावर ओवेसी असहमत, सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.