मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) संख्याबळ नसतानाही, धनंजय महाडिक यांचा विजय घडवून आणत भाजपाने (bjp) महाविकास आघाडीला (maha vikas aghadi) धक्का दिला आहे. याचे श्रेय आर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या गणिताला आणि जुळवाजुळवीला दिलं जातंय. पण त्यांच्याच को्र टीममधील आणखी सदस्य या कौतुकाला पात्र आहे. त्याचं नाव आशिष कुलकर्णी. आशिष कुलकर्णी यांच्या रणनीतीमुळेच, भाजपाला सहाव्या उमेदवाराचा विजय दृष्टीपथात आल्याचे सांगण्यात येते आहे. सद्यस्थितीत आशिष कुलकर्णी हे भाजपाच्या प्रदेश महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी त्य़ांच्या राजकीय करिअरची सुरुवात शिवसेनेतून केली होती. २००३ साली ते शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. २०१७ साली त्यांनी काँग्रेसही सोडली आणि काही काळ राजकारणापासून दूर राहिले. आता ते भाजपात परतले असून त्यांच्या नव्या राजकीय. इनिंगला त्यांनी सुरुवात केली आहे.
भाजपाने या निवडणुकीत त्यांच्याकडे असलेली मतांपैकी सर्वाधिक पहिल्या क्रमांकाची मते ही पियुष गोयल आणि अनिल बोंडेंना दिली. प्रत्येकी ४८ मते देण्यात आली. तसेच दुसऱ्या पसंतीची सर्व मते ही धनंजय महाडिक यांना देण्यात आली. ही योजना आशिष कुलकर्णी यांची होती, असे सांगण्यात येते आहे. केंद्रीय पर्यवेक्षक अश्विनी वैष्णव यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला प्रत्यक्षात उतरवण्याचे काम केले. अशी माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे.
गोयल आणि बोंडे यांना प्रत्येकी ४८ मते मिळाली. यातील कोट्यानंतरची मते ही तिसऱ्या उमेदवाराला हस्तांतरित झाली. भाजपाला एकूण १२३ मते मिळाली, त्यात भाजपाचे १०६, ८ अपक्ष आणि ९ इतर आमदारांची मते मिळाल्याचे सांगण्यात येते आहे.
आशिष कुलकर्णी यांची कादावरची योजना जमिनीवर वास्तवात उतरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केवळ फडणवीस आणि अश्विनी वैष्णव या दोघांनाच या योजनेची माहिती असल्याचंही सांगण्यात येतं आहे. फडणवीस यांनी कौशल्याने अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदारांना भाजपाकडे वळवलं, हे त्यांचं मोठं श्रेय आहे.
आशिष कुलकर्णी यांनी सुरुवातीच्या दिवसांत शिवसेनेच्या सुभाष देसाई यांच्यासोबत काम केले. त्यानंतर काही दिवसांनी ते बाळासाहेब ठाकरेंच्या विश्वसनीय मंडळीत गणले जाऊ लागले. शिवसेना पक्षाची कमान बाळासाहेबांकडून उद्धव यांच्या हातात आल्यानंतर, आशिष यांना बाजूला करण्यात आले. त्यावेळी त्यांनी अतर काही नेत्यांप्रमाणेच शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. नारायण राणे आणि कुलकर्णी यांचेही चांगले संबंध आहेत. काँग्रेसमध्ये आल्यावर २००९ साली त्यांच्याकडे ६ लोकसभा जागांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या सहाही जाा काँग्रेस विजयी झाली. याच वर्षी विधानसभेची जबाबदारीही कुलकर्णींवर होती, त्यातही त्यांनी सिद्ध करुन दाखवले. गांधी परिवारानेही आशिष कुलकर्णी यांच्या कामाचा अंदाज आला. त्यानंतर अहमद पटेल यांच्यासोबत काम करण्यासाठी त्यांना काही काळ दिल्लीलाही बोलावण्यात आले होते.