Monsoon : महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस पावसाचेच, मुंबई, ठाणे अन् पालघरमध्ये मात्र ‘रेड अलर्ट’, उर्वरित राज्यात काय स्थिती राहणार?
कोकणात दाखल झालेल्या मान्सूनला राज्य व्यापण्यासाठी महिन्याचा कालावधी गेला असला तरी पावसाचा जोर मात्र, कोकण आणि मुंबईवरच राहिलेला आहे. जून महिन्यात सरासरी एवढा पाऊस केवळ कोकणात झाला होता. आता कुठे वरुणराजाने राज्यात हजेरी लावली आहे. असे असले तरी 8 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : गेल्या चार दिवसांपासून (Maharashtra) राज्यात पाऊस सक्रीय झाला असला तरी जोर मात्र, मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणावरच कायम आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून राज्यात जवळपास चारही विभागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. 8 जुलै (शुक्रवारी) रोजी तर मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच या शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडावे असेही आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई आणि ठाणे पर्यंत मर्यादित असेलेला (Monsoon) पाऊस आता पालघरला घेरले आहे. या तीन शहरांसाठी हवामान विभागाने (Red Alert) रेड अलर्ट जारी केला असला तरी उर्वरित राज्यातही मुसळधार पण तुरळक ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यात पाऊस तर सक्रीय झालाच पण त्याचा जोरही वाढत आहे हे विशेष.
कोकण, मुंबईत सर्वाधिक पाऊस
कोकणात दाखल झालेल्या मान्सूनला राज्य व्यापण्यासाठी महिन्याचा कालावधी गेला असला तरी पावसाचा जोर मात्र, कोकण आणि मुंबईवरच राहिलेला आहे. जून महिन्यात सरासरी एवढा पाऊस केवळ कोकणात झाला होता. आता कुठे वरुणराजाने राज्यात हजेरी लावली आहे. असे असले तरी 8 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
The IMD #Mumbai has issued a #Red alert for Mumbai, Thane and Palghar for tomorrow, July 8, indicating heavy rainfall a few places & extremely heavy rains too at isolated places. #MumbaiRains pic.twitter.com/Osv7EU8P90
— Richa Pinto (@richapintoi) July 7, 2022
हवामान विभागाकडून अतिवृष्टीची इशारा
जुलै महिन्यात मान्सून आपले रुप बदलेन असा विश्वास हवामान विभागने व्यक्त केला होता. आता तो खरा होताना पाहवयास मिळाला आहे. राज्यात तर पाऊस सक्रीय झाला आहेच पण पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस हे राज्यात पावसाचेच राहणार आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघरसह मध्य महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
खरीप पेरणीला पोषक वातावरण
आतापर्यंत मर्यादित क्षेत्रावर बरसत असलेल्या वरुणराजाने आता महाराष्ट्र व्यापाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून असलेले सातत्य सात दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे खरीप पेरणीसााठी आवश्यक असलेला पाऊस जवळपास सर्वच विभागात झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरणी कामे मार्गी लागत आहेत. उशिरा का होईना दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समधान व्यक्त होत आहे.