‘इंडिया आऊट’चा नारा देणारा मालदीव पुन्हा भारताच्या दारी, या 6 विभागात भारताशिवाय मालदीवचा हालत नाही पत्ता

mohammad muizzu in india: देशासमोर संकट येताच चीनचे मित्र असलेले मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू वठणीवर आले आहे. आता ते पुन्हा भारत दौऱ्यावर आले आहेत. गेल्या चार महिन्यात त्यांचा हा दुसरा भारत दौरा आहे.

'इंडिया आऊट'चा नारा देणारा मालदीव पुन्हा भारताच्या दारी, या 6 विभागात भारताशिवाय मालदीवचा हालत नाही पत्ता
mohammad muizzu
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 10:45 AM

भारताशी पंगा घेणे मालदीवला चांगलेच महागात पडले आहे. मालदीवची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. मालदीवकडे आता दीड महिना पुरेल इतकीच परकीय गंगाजळी आहे. देशासमोर संकट येताच चीनचे मित्र असलेले मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू वठणीवर आले आहे. आता ते पुन्हा भारत दौऱ्यावर आले आहेत. गेल्या चार महिन्यात त्यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. दोन्ही राष्ट्रांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी मुइज्जू भारतात येत आहेत.

मुईज्जू यांना का आठवला भारत

मालदीवची परकीय गंगाजळी आता 40 कोटी डॉलरवर आली आहे. त्यात फक्त दीड महिन्यांचा खर्च चालणार आहे. मालदीवने ‘इंडिया आऊट’चा नारा दिला होता. तसेच मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे भारतीयांनी मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सोशल मीडियावर सुरु केली होती. भारतीयांच्या या मोहिमेमुळे मालदीवचे पर्यटन क्षेत्र संकटात आले.

आता काय म्हणतात मुइज्जू

मुइज्जू यांनी भारतात येण्यापूर्वी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मालदीव आर्थिक संकटात आहे. आम्हाला आशा आहे, भारत आमची मदत करेल. मालदीव सरकारच्या वेबसाइटवर मुइज्जू यांची भारत यात्रेसंदर्भात एक विशेष पान बनवण्यात आले आहे. त्यात मुइज्जू यांच्या दौऱ्याची सर्व माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

या सहा विभागात मालदीव भारतावर अवलंबून?

मालदीवला 1965 मध्ये स्वातंत्र मिळाले. त्यानंतर मालदीव भारतावर अनेक गोष्टींवर अवलंबून राहिला आहे.

  1. संरक्षण क्षेत्रात 1988 पासून भारत मालदीवला मदत करत आहेत. मालदीवच्या नॅशनल डिफेन्स फोर्सला 70 टक्के सामान भारतच देतो.
  2. मालदीवमधील पायाभूत सुविधा क्षेत्रात भारताची महत्वाची भूमिका राहिली आहे. मालदीवचा ग्रेटर माले कनेक्टिविटी प्रोजेक्ट त्याचे उदाहरण आहे. या प्रकल्पात भारताने 50 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.
  3. आरोग्य सेवेत भारतावर मालदीव अवलंबून आहे. मालदीवमध्ये इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलसाठी भारताने 52 कोटी रुपये दिले आहे. तसेच आणखी एक कॅन्सर हॉस्पिटल भारत सुरु करत आहे.
  4. शिक्षणात भारताने मालदीवला 1996 मध्ये टेक्निकल एजुकेशन इंस्टीट्यूट उघडण्यासाठी मदत केली. भारताच्या मदतीने मालदीवमध्ये 53 लाख डॉलरचा व्हेकेशनल ट्रेनिंग प्रोजेक्ट सुरु आहे.
  5. भारत आणि मालदीवमधील व्यापार 2014 नंतर चार पट वाढला. 2022 मध्ये दोन्ही देशांतील व्यापार 50 कोटी डॉलर होती. यापूर्वी 2014 मध्ये हा व्यापार 17 कोटी डॉलर होता.
  6. पर्यटनावर मालदीव पूर्णपणे भारतीयांवर अवलंबून आहे. मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक पर्यटक भारतातील आहे. परंतु आता भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकला आहे.
'लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल...', गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?
'लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल...', गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.