मालदीवचा उद्दामपणा संपला, मैत्री करण्यासाठी उचलले असे पाऊल, आता India Out ऐवजी Digital India ची घोषणा
Maldives India Rupay Card: भारत सरकार अनेक देशांमध्ये UPI सर्व्हिस लॉन्च करत आहे. डिजिटल इंडिया मोहिमेस जगभरातून पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत सात देशांमध्ये ही सेवा सुरु झाली आहे. फ्रॉन्स, सिंगापूर, मॉरिशस, श्रीलंका, भूतान आणि UAE मध्ये यूपीआय सर्व्हिस लॉन्च करण्यात आली आहे.

भारताशी पंगा घेणाऱ्या मालदीवचा उद्दामपणा संपला आहे. भारताशी शत्रूत्व घेतल्यानंतर होणारे परिणाम पाहून मालदीवचे डोके ठिकाणावर आले आहे. मालदीवमधील निवडणुकीपूर्वी India Out चा घोषणा देणारा मालदीवला यूटर्न घ्यावा लागला आहे. भारताच्या रणनीतीमुळे चीनचे गेम उलटला आहे. भारतातून जाणारे पर्यटक घटल्यामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला. यामुळे भारताशी मैत्री करण्यासाठी मालदीवने भारतचे RuPay सर्व्हीस सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. मालदीवच्या या प्रयत्नांमुळे दोन्ही देशांमध्ये वाढलेला तणाव कमी होण्याची शक्यता आहे. मालदीव सरकारमधील मंत्र्याने सांगिले की, RuPay सर्व्हीसमुळे मालदीवचे चलन मजबूत होणार आहे.
काय आहे प्रस्ताव
मालदीवमधील अर्थव्यवस्था विकास आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद यांनी म्हटले की, भारताच्या दौऱ्यात रुपेकार्ड लागू करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात येणार आहे. मालदीव भारतीय लोकांच्या सुविधेसाठी आपल्या देशात रुपे कार्ड सुरु करणार आहे. भारतातून मालदीवमध्ये जाणारे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्वांना Rupay कार्ड सेवेचे फायदा होईल. परंतु हे कार्डकधीपासून लॉन्च करणार आहे, त्याची माहिती दिली गेली नाही.
मालदीवने चीनचे ऐकून भारताशी पंगा घेतला. त्यानंतर भारतीय पर्यटकांनी बायोकॉट मालदीव ही मोहीम सुरु केली. त्याचा फटका मालदीवला बसताच तो देश आता ठिकाणावर आला आहे. आता भारताशी मैत्री करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.




सात देशांमध्ये भारताची यूपीआय सर्व्हिस
भारत सरकार अनेक देशांमध्ये UPI सर्व्हिस लॉन्च करत आहे. डिजिटल इंडिया मोहिमेस जगभरातून पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत सात देशांमध्ये ही सेवा सुरु झाली आहे. फ्रॉन्स, सिंगापूर, मॉरिशस, श्रीलंका, भूतान आणि UAE मध्ये यूपीआय सर्व्हिस लॉन्च करण्यात आली आहे.
नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) रुपे कार्ड लॉन्च केले गेले आहे. ग्लोबल कार्ड पेमेंट नेटवर्कमध्ये समावेश झालेले हे भारताचे पहिले कार्ड आहे. मोहम्मद सईद यांनी भारतच्या रुपे सर्व्हिसमुळे मालदीवचा रुफिया (MVR) मजबूत होणार असल्याचे म्हटले आहे.