काँग्रेसनं आधी भाजपवर केली सडकून टीका, नंतर द्यावं लागलं स्पष्टीकरण, नेमकं कोण काय बोललं…
भाजप आणि आरएसएस आणि त्यांच्या नेत्यांच्या फुटीरतावादी विचारसरणीला मी पाच दशकांपासून विरोध करत आलो आहे. माझा राजकीय लढा त्यांच्या राजकारणाविरुद्ध होता, आहे आणि राहील.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गुरुवारी अडचणीत सापडले. खर्गे यांनी भाजपवर टीका करताच त्यांना भाजपने घेरले असता त्यांना त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. खर्गे यांनी सांगितले की, मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्यांना विष समजा किंवा मानू नका, पण त्याचा स्वाद घेतला तर मृत्यू होईल. त्यामुळे तुम्हाला आता खरचं प्रश्न पडत असेल की हे खरंच विष आहे का? मल्लिकार्जून खर्गे यांच्या त्या विधानावर भाजपने त्यांना घेरले असता त्यावर स्पष्टीकरण देत ते म्हणाले की, मी पंतप्रधान यांच्याबद्दल बोललो नाही. आणि मी वैयक्तिक विधानंही केले नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
काँग्रेसला भाजपने घेरल्यावर मल्लिकार्जून खर्गे यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भाजपची विचारधारा फुटीरतावादी, शत्रुत्वाची, गरीब आणि दलितांबद्दल द्वेषाची असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
त्यावेळी ते म्हणाले की, मी द्वेष आणि द्वेषाच्या राजकारणावर चर्चा केली. माझे विधान पंतप्रधान मोदींसाठी वैयक्तिकरित्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी नव्हते, तर ते ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्यावरून माझ्यावर त्यांनी टीका केली होती.
मल्लिकार्जून खर्गे यांनी आपली बाजू स्पष्ट करताना त्यांनी लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची आमची लढाई ही वैयक्तिक नाही. त्यामुळे ही वैचारिक लढाई आहे.
BJP की विचारधारा विभाजनकारी, वैमनस्यपूर्ण तथा ग़रीबों व दलितों के प्रति नफ़रत व पूर्वाग्रह से भरी है।
मैंने इसी नफ़रत व द्वेष की राजनीति की चर्चा की। मेरा बयान न व्यक्तिगत तौर से प्रधानमंत्री मोदी जी के लिये था ना किसी और व्यक्ति विशेष के लिए..
— Mallikarjun Kharge (@kharge) April 27, 2023
कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता आणि कळत-नकळत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तो माझा हेतू कधीच नव्हता आणि माझ्या दीर्घ राजकीय जीवनाचा तो माझा भागही नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
खर्गे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी नेहमीच मित्र आणि विरोधकांसाठी राजकीय शुद्धतेचे नियम आणि परंपरांचे पालन केले आहे. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तेच करणार आहे.
मी उच्च पदांवर बसलेल्या लोकांप्रमाणे लोकांची आणि त्यांच्या समस्यांची चेष्टा करत नाही कारण मी गरीब आणि दीनदुबळ्यांच्या व्यथा आणि वेदना पाहिल्या आहेत.
भाजप आणि आरएसएस आणि त्यांच्या नेत्यांच्या फुटीरतावादी विचारसरणीला मी पाच दशकांपासून विरोध करत आलो आहे. माझा राजकीय लढा त्यांच्या राजकारणाविरुद्ध होता, आहे आणि राहील असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.