खर्गेंचा पहिलाच आणि मोठा निर्णय; CWC च्या जागी नवीन समिती; शशी थरुरांचा पत्ता कट
मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष बनताच सीडब्लूसीबाबत मोठा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्लीः काँग्रेसच्या अध्यक्ष (Congress President) पदाच्या निवडणुकीपासून अध्यक्षपदाची जोरदार चर्चा होती. त्यानंतर निवडणूक होऊन मल्लिकार्जुन खर्गे भरघोस मतांनी विजयी झाल्यानंतरही निर्णयाबाबत जोरदार चर्चा होऊ लागली. त्यामुळे आता मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी काँग्रेसचे अध्यक्ष बनताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. खर्गे यांनी आता काँग्रेस वर्किंग कमिटी (Congress Working Committee) ऐवजी दुसरी समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
त्या समितीमध्ये 47 सदस्यांना स्थान देण्यात आले असून त्यामध्ये काही नेत्यांची नावं वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या खर्गे यांच्या या निर्णयाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष बनताच सीडब्लूसीबाबत मोठा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये त्यांच्यावतीने सीडब्लूसीऐवजी दुसरी समिती स्थापन करण्यात आली आहे.
त्या समितीमध्ये 47 सदस्यांना स्थान देण्यात आले असून त्यामधून काही नावं वगळण्यात आली असून काही नव्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.
या समितीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग, ए. के. अँटनी या नावांचा त्या यादीत निश्चितच स्थान देण्यात आले आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटी पक्षाबाबत महत्वाचे आणि मोठ निर्णय घेते.आणि त्या समितीमध्ये एकूण 23 सदस्य आहेत. पण आता मल्लिकार्जुन खर्गे यांनी ती काँग्रेस कार्यकारिणीही रद्द केली आहे.
त्यांच्या जागी त्यांनी नवीन समिती स्थापन केली असून त्यामध्ये 47 सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. आता ही समिती अनेक मोठे निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.