शरद पवारांशी भेट नाही, पण दर दोन महिन्याने दिल्लीत येणार; बंगालला जाता जाता ममता बॅनर्जींची केंद्राविरोधात डरकाळी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पाच दिवसीय दिल्ली दौरा आज संपला असून त्या बंगालला रवाना झाल्या. या पाच दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली.
नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पाच दिवसीय दिल्ली दौरा आज संपला असून त्या बंगालला रवाना झाल्या. या पाच दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. पुढच्यावेळी पवारांना भेटेन असं त्यांनी सांगितलं. पण, बंगालला जाता जाता त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्लाही चढवला. (Mamata Banerjee Spoke to Sharad Pawar, Say Sources Amid Speculations Over Them Not Meeting)
ममता बॅनर्जी या दिल्लीत आल्या होत्या. बंगालच्या विजयानंतर त्या पहिल्यांदाच दिल्लीत आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या हालचाली आणि भेटीगाठींकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, भाजप नेते नितीन गडकरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. त्या शरद पवारांचीही भेट घेणार होत्या. पवारांनीही ममता दीदी मंगळवारी भेटणार असल्याचं म्हटलं होतं. पण या दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे पवारही मुंबईकडे रवाना झाले आहेत.
पवारांशी फोनवर चर्चा
मी शरद पवारांशी फोनवर चर्चा केली आहे. पण त्यांना प्रत्यक्ष भेटू शकले नाही. मात्र, मी दर दोन महिन्याने दिल्लीला येत राहणार असल्याचं ममतादीदींनी सांगितलं. मात्र पवारांशी काय चर्चा झाली हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
राजकीय हेतूनेच भेटीगाठी
माझा दौरा यशस्वी ठरला आहे. राजकीय हेतूनेच मी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. लोकशाही धोक्यात आहे. म्हणजे देशही धोक्यात आहे. त्यामुळे लोकशाही टिकून राहिली पाहिजे. लोकशाही वाचवा, देश वाचवा हाच आमचा नारा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्याही मागण्यांशी सहमत आहोत. तसेच दर दोन महिन्यांनी आम्ही सर्व नेते दिल्लीत येत राहणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
दीदी पंतप्रधान होणं महत्वाचं नाही…
ममता बॅनर्जी यांनी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांचीही भेट घेतली होती. यावेळी अख्तर यांनी थेट उत्तरं दिली. ममता बॅनर्जी पंतप्रधान होणार की नाही या पेक्षा देश कसा चालवला गेला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. कशाप्रकारची लोकशाही असावी, आजही चांगली आहे आणि उद्याही आणखी चांगली असावी, असं अख्तर म्हणाले.
लोकसभा निवडणुकी आधीच महाआघाडी?
ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी महाआघाडीची गरज व्यक्त केली होती. बंगालहून दिल्लीला येण्यापूर्वी त्यांनी विरोधकांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीत विरोधी नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीने काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांना घेऊन महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. या आघाडीने शक्ती प्रदर्शनही केलं होतं. त्यावेळी एकूण 23 पक्ष एकवटले होते. त्यामुळे भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहील असं बोललं जात होतं. मात्र, निवडणुकीपूर्वीच महाआघाडीचा हा प्रयोग फोल ठरला होता. (Mamata Banerjee Spoke to Sharad Pawar, Say Sources Amid Speculations Over Them Not Meeting)
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 30 July 2021 https://t.co/g8b2cBouKi #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2021
संबंधित बातम्या:
आणीबाणीपेक्षाही भयावह स्थिती, विरोधक एकत्र आल्यास सहा महिन्यात परिणाम दिसतील: ममता बॅनर्जी
(Mamata Banerjee Spoke to Sharad Pawar, Say Sources Amid Speculations Over Them Not Meeting)