मोदी माझ्यावर जळतात, रोमला जाण्यास परवानगी नाकारल्याने ममता बॅनर्जी संतापल्या
इटलीच्या रोममध्ये मदर तेरेसा यांच्या स्मरणार्थ विश्व शांती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. (Mamata Banerjee)
नवी दिल्ली: इटलीच्या रोममध्ये मदर तेरेसा यांच्या स्मरणार्थ विश्व शांती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, केंद्र सरकारने ममता बॅनर्जी यांना या कार्यक्रमास जाण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. मोदी माझ्यावर जळतात. त्यामुळेच त्यांनी मला रोमला जायची परवानगी नाकारली आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. (Mamata Banerjee upset over not getting permission from the Center for Rome journey, said ‘PM Modi is jealous of me’)
मुख्यमंत्र्यांनी रोमच्या कार्यक्रमात भाग घ्यावा अशी परिस्थिती नाही. त्यामुळे त्यांना कार्यक्रमाला जाण्यास परवानगी देण्यात येत नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. यापूर्वी केंद्र सरकारने ममता बॅनर्जी यांचा चीन दौराही रद्द केला होता. त्यामुळे राज्य सचिवालयाने नाराजी व्यक्त केली होती. रोममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात जर्मनीचे चान्सलर अँजेला मर्केल, पोप फ्रान्सिस आणि इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅगी सहभागी झाले होणार आहेत. 6 ते 7 ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. मात्र या कार्यक्रमात ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत. इटलीच्या सरकराने ममता बॅनर्जींना आमंत्रित केलं होतं. निमंत्रण मिळाल्यानंतर ममतादीदींनी रोमला जाण्याची तयारीही केली होती. उद्योग जगताशीही त्या चर्चा करणार होत्या.
मी एक हिंदू महिला, तुम्ही जळता
तुम्ही मला थांबवू शकत नाही. परदेशात जाण्यास मी उत्सुक नाहीये. मात्र, या दौऱ्याचा संबंध राष्ट्र सन्मानाशी होता. तुम्ही नेहमी हिंदूंबाबत बोलता. मीही एक हिंदू महिला आहे. तरीही तुम्ही मला परदेशात जाण्यास परवानगी का नाकारली आहे? तुम्ही माझ्यावर जळता, अशी टीका ममतादीदींनी केली आहे. आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करायचं आहे. भारतात तालिबानी भाजप चालू शकत नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी टीएमसी पुरेशी आहे. खेला भबनीपूरपासून सुरू होईल आणि संपूर्ण देशात आमच्या विजयोत्सवानेच संपेल, असंही त्या म्हणाल्या.
हिंदू महिलेला परवानगी नाकारली
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर विश्व शांती संमेलनातील हिंदूंचं प्रतिनिधीत्व राहिलं नाही. मी काही विदेशात फिरायला जात नाही. हा देशाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा होता. रोमने दोन महिन्यांपूर्वीच मला संपर्क साधला होता. भारत आणि बांगलादेशींना इटलीत बोलावलं जात नव्हतं. तरीही त्यांनी मला रोमला येण्याचं विशेष आमंत्रण दिलं. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने ही परवानगी नाकारली, असं सांगतानाच हिंदू धर्माच्या नावाने गळा काढणाऱ्यांनी हिंदू महिलेला परदेशात जाण्यापासून का रोखलं? ही तर एक प्रकारची हिंसाच आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. (Mamata Banerjee upset over not getting permission from the Center for Rome journey, said ‘PM Modi is jealous of me’)
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 26 September 2021 https://t.co/wMZJasE8iD #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 26, 2021
संबंधित बातम्या:
Goa Assembly Election : तृणमूल काँग्रेसची मोठी घोषणा, गोव्याच्या मैदानात शड्डू ठोकणार!
ओबीसींची लढाई लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय; पण घाबरून चालणार नाही: छगन भुजबळ
(Mamata Banerjee upset over not getting permission from the Center for Rome journey, said ‘PM Modi is jealous of me’)