मंदिरात डोकं टेकवलं आणि तिथेच प्राण गमावले, त्या युवकाचा देवाच्या दारातच झाला मृत्यू

एक तरूण रोजच्याप्रमाणे सकाळी धावून देवळात पूजा करायला गेला . पूजा झाल्यावर देवळात नमस्कार करत असताना तो तेथेच कोसळला तो परत उठलाचा नाही.

मंदिरात डोकं टेकवलं आणि तिथेच प्राण गमावले, त्या युवकाचा देवाच्या दारातच झाला मृत्यू
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 2:58 PM

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रामबाग पार्कजवळ राहणारा 19 वर्षीय तरुण दररोज हनुमान मंदिरात प्रार्थना (temple) करण्यासाठी जात असे. शुक्रवारी सकाळीही हा तरुण पूजेसाठी गेला होता. पूजा केल्यानंतर हा तरुण मंदिराच्या उंबरठ्याशी नमस्कार करण्यास वाकला असता, तेथेच खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू (died in temple) झाला. तरुणाच्या मृत्यूचे वृत्त कळताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला. अवघ्या 19 वर्षांच्या तरूणाच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तरूणाचा जीव गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

खरंतर हे संपूर्ण प्रकरण एट्टामदौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ट्रान्स यमुना येथे राहणारा ब्रजेश बघेल हा युवक रोज सकाळी धावायला जायचा. त्यानंतर तो रोज सकाळी जवळच्याच हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी जात असत. रोजच्या प्रमाणे शुक्रवारी हा तरुण धावून झाल्यानंतर पूजेला गेला. पूजा केल्यानंतर ब्रजेश मंदिराच्या उंबरठ्याला नमस्कार करत असतानाच तो तेथेच कोसळला आणि त्याचा अचानक त्याचा मृत्यू झाला.

ही बाब कुटुंबीयांना समजताच संपूर्ण कुटुंबात खळबळ उडाली. तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याची माहिती मिळताच मंदिरात लोकांची गर्दी जमली, पोलीसही घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तरूणाच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमेचे निशाण नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे खरे कारण समोर येईल. प्रथमदर्शनी हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण असल्याचे दिसते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.