चुकून खात्यात साडे पाच लाख रुपये आले, पठ्ठ्या म्हणतो “मोदींनी दिले परत करणार नाही,” बँकही हैराण
बिहारमधील एका व्यक्तीने अजब कारनामा केला आहे. त्याने बँकेच्या चुकीमुळे त्याच्या खात्यावर आलेले साडे पाच लाख रुपये खर्च करुन टाकले आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेने पैसे परत मागण्यासाठी विचारणा करताच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दाखला दिलाय.
पटणा : बिहारमधील एका व्यक्तीने अजब कारनामा केला आहे. त्याने बँकेच्या चुकीमुळे त्याच्या खात्यावर आलेले साडे पाच लाख रुपये खर्च करुन टाकले आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेने पैसे परत मागण्यासाठी विचारणा करताच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दाखला देत मोदी एकूण पंधरा लाख रुपये खात्यावर टाकणार होते; त्याच पैशांतील एक हिस्सा माझ्या खात्यावर आला असावा, असा युक्तीवाद या तरुणाने केलाय. (man form bihar got five lakh rupees by bank error said rupees given by prime minister narendra modi refuses to return it)
बँकेच्या चुकीमुळे खात्यावर आले साडे पाच लाख रुपये
ही करामत करणाऱ्या तरुणाचे नाव रंजित दास असून त्याच्या खात्यावर मार्च महिन्यात अचानक साडे पाच लाख रुपये जमा झाले होते. हे पैसे नेमके कुठून आले, याचा तपास न करता त्याने सर्व रक्कम खर्च केली होती. बँके कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे हा प्रकार घडला होता. एका दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवताना ते चुकून रंजित दास नावाच्या खात्यावर गेले. नंतर बँकेनं अनेक नोटिसा पाठवून संबंधित व्यक्तीला पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र माझ्या खात्यात आलेले पैसे मी का देऊ, असं उत्तर तरुण देत राहिला.
तरुण म्हणतो पैसे मोदींनी पाठवले
अखेर बँकेनं पोलिसांकडे दाद मागितली. पोलिसांनी तरुणाला गाठून त्याला बेड्या ठोकल्या. पैसे तुझे नव्हते, तर ते खर्च का केले ? अशी विचारणा पोलिसांनी त्याच्याकडे केली. या तरुणाने पोलिसांना मात्र चक्रावून सोडणारं उत्तर दिलं. मोदी लोकांना 15 लाख रुपये देणार होते. त्यामुळे माझ्या खात्यात जमा झालेले साडे पाच लाख रुपये हा त्याच पंधरा लाखांचा पहिला हफ्ता असावा, असं तरुण म्हणाला.
पैसे परत कसे मिळवावे बँकेसमोर प्रश्न
विशेष म्हणजे याच समजापोटी त्यानं साडे पाच लाख रुपये खर्चसुद्धा केले. नजरचुकीनं किंवा तांत्रिक बिघाडामुळे चुकीच्या खात्यावर जमा झालेले पैसे बँकेला परत करावेच लागतात. तसा नियम आहे. मात्र साडे पाच लाख रुपये तरुणानं खर्च केल्यामुळे साडे पाच लाख रुपये परत कसे मिळवावे हा प्रश्न पोलीस आणि बँकेलाही पडलाय. या प्रकाराची सध्या देशभर चर्चा सुरु झाली आहे.
इतर बातम्या :
सहा वर्षांचा लेक ठरला प्रेमात अडथळा, सख्ख्या आईकडून प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या
Aamna sharif : अभिनेत्री आमना शरीफचा कातिलाना अंदाज, पाहा खास फोटोhttps://t.co/SDGRv7Hhn5#AamnaSharif #Bollywood #AmazingPictures
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 16, 2021
(man form bihar got five lakh rupees by bank error said rupees given by prime minister narendra modi refuses to return it)