बिबट्यासाठी लावला पिंजरा, पण अडकला ग्रामस्थ, कारण समजले तर हासणे थांबणार नाही
त्या व्यक्तीस पिंजऱ्यात अडकल्याचे पाहून लोकांनी व्हिडिओ बनवला आणि नंतर व्हायरल केला. याबाबत काही ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली.
लखनऊ : लालच व्यक्तीला कुठेही घेऊन जाऊ शकतो. एखाद्या गोष्टीची लालसा किंवा ती सवय लागली म्हणजे व्यक्ती काही करण्यास तयार होते. उत्तर प्रदेशातील बुलंद शहरात अशीच एक आगळवेगळी घटना घटलीय. वनविभागाने बुलंदजवळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. मग त्या बिबट्यासाठी कोंबडी पिंजऱ्यात सोडली आणि कर्मचारी निघून गेले. त्यावेळी एक ग्रामस्थ आला. त्याला चिकन खाण्याची लालसा निर्माण झाली. मग काय, पिंजऱ्यातून कोंबडी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तो स्वतःच पिंजऱ्यात अडकला. रात्रभर पिंजऱ्यात राहिला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पिंजरा लावला कोणासाठी अन् आडकला कोण?#Bulandshahr #forestdepartment #Leopard #videovrial pic.twitter.com/B3PH7dQZfa
हे सुद्धा वाचा— jitendra (@jitendrazavar) February 26, 2023
नेमके काय झाले
बुलंद परिसरात काही दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक चिंतेत आहेत. यासंदर्भात वनविभागाकडे तक्रार केली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. बिबट्यासाठी सावज म्हणून कोंबडी पिंजऱ्यात ठेवण्यात आली.
तीन दिवस होता पिंजरा
चक्क तीन दिवसांपासून गावात पिंजरा ठेवण्यात आला आहे, मात्र बिबट्या जेरबंद झाला नाही. यानंतर वनविभागाचे पथक तिसऱ्या दिवशी सायंकाळी रवाना झाले. त्याच एक ग्रामस्थ त्या ठिकाणाहून जात होता. त्याला चिकन खाण्याची इच्छा झाली. त्याने पिंजऱ्यातील कोंबडी काढण्याचा प्रयत्न केला. पण तोच पिंजऱ्यात जाऊन अडकला.
त्या व्यक्तीस पिंजऱ्यात अडकल्याचे पाहून लोकांनी व्हिडिओ बनवला आणि नंतर व्हायरल केला. याबाबत काही ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून त्या व्यक्तीला पिंजऱ्यातून बाहेर काढले.
पिंजऱ्यात बिबट्या अजून आला की नाही, याची माहिती मिळाली नाही. परंतु तो ग्रामस्थ अडकल्याची बातमी शहरातच नाही, देशभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला समज दिली आहे.
पुणे जुन्नरमध्ये बिबट्या जेरबंद
उत्तर प्रदेशात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला की नाही, ते कळाले नाही. परंतु पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. दोन दिवसापूर्वी गोविंद हाडवळे या शेतकऱ्याच्या शेतात पिंजरा लावला होता .या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद बंद झालाय.
परिसरात पाळीव प्राण्यांवरती या बिबट्याने हल्ले करून दहशद निर्माण केली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी पिंजऱ्याची मागणी केल्यानंतर येथे पिंजरा लावण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी येथील बंगल्याच्या आवारात येऊन बिबट्याने पाळीव कुत्र्यावरती हल्ला केला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे. यानंतर हा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. या बिबट्याला माणिक डोह निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे .